शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

इन्फ्रा दोनचे काम कासवगतीने सुुरू

By admin | Updated: July 28, 2015 01:17 IST

औरंगाबाद : महावितरण परिमंडळात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांची कामे करीत आहे; पण हे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे अद्यापही अनेक ग्राहक

औरंगाबाद : महावितरण परिमंडळात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांची कामे करीत आहे; पण हे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे अद्यापही अनेक ग्राहक सेवेपासून कोसोदूर आहेत. त्यामुळे इन्फ्रा दोनच्या कामांची गती वाढवावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. ग्राहकांची वाढती संख्या व विजेच्या मागणीमुळे कंपनीला सेवा-सुविधा देताना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. परिमंडळातील अनेक भागांत अद्यापही विद्युत लाईन न टाकल्यामुळे शेतकरी आणि नागरिक वीजजोडणीपासून कोसोदूर आहेत. ग्राहकांना सेवा आणि सुविधा देता यावी म्हणून पायाभूत आराखडा दोन (इन्फ्रा-२) मध्ये औरंगाबाद शहर - ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात ३४८ कोटी ४७ लाख रुपयांचे काम करण्यात येणार आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागात ११ सब-स्टेशन, कन्नड- ९ तर जालन्यामध्ये ९ सब-स्टेशन उभारण्यात येणार आहेत. परिमंडळात हायटेन्सेनची १ हजार ८१४ कि़ मी.ची लाईन टाकण्यात येणार आहे. तर भूमिगत हायटेन्सेनची लाईन ५ कि. मी. टाकण्यात येणार आहे. एल.टी. लाईन २०५२ कि़ मी. टाकण्यात येणार आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागात २५० कि़मी., कन्नड-३४० कि़ मी., जालना जिल्ह्यात १४५२ कि़ मी. लाईनचा समावेश आहे. परिमंडळात २,८७३ नवीन रोहित्र बसविण्यात येणार आहेत. २०५२ रोहित्रांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. (६३ केव्ही रोहित्रांच्या ठिकाणी १०० केव्हीचे रोहित्र बसविण्यात येणार आहेत.) या साडेतीनशे कोटींच्या कामांपैकी बहुतांशी कामे सुरू करण्यात आलेली आहेत; पण हे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे त्याचा फटका कंपनी आणि ग्राहकांना बसत आहे. शेतात आणि वाड्या- वस्त्यांमध्ये विद्युत लाईन नसल्यामुळे आजही अनेक ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. जोडणी मिळत नसल्यामुळे नागरिक आकडा टाकून वीज घेतात. त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.