शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरमध्ये शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, जिल्हाप्रमुख जंजाळांविरोधात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 20:12 IST

शिंदसेनेत काही महिन्यांपासून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. आता स्वीकृत नगरसेवकाच्या नियुक्तीवरून पक्षांतर्गत वाद पुन्हा उफाळला आहे.

छत्रपती संभाजीनगर : स्वीकृत नगरसेवक पदावरून शिंदेसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पालकमंत्री संजय शिरसाट यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे विनोद बनकर हे नगरसेवक पदाच्या स्पर्धेत होते. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यासह समर्थकांनी सोमवारी क्रांती चौकात जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.

शिंदसेनेत काही महिन्यांपासून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. आता स्वीकृत नगरसेवकाच्या नियुक्तीवरून पक्षांतर्गत वाद पुन्हा उफाळला आहे. सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिंदेसेनेला एक स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्याची संधी होती. या पक्षातील अनेक पदाधिकारी शर्यतीत होते. पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी शुभम काळे यांची शिफारस केल्याने त्यांची नियुक्ती झाली. पालकमंत्री संजय शिरसाट यांचे कट्टर समर्थक विनोद बनकर हे या पदासाठी इच्छुक होते. आपल्याला डावलल्याचे कळताच बनकर आणि त्यांचे समर्थक संतप्त झाले. सोमवारी सायंकाळी क्रांती चौकात जमा होऊन बनकर आणि त्यांच्या समर्थकांनी जंजाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले. शिवसेना झिंदाबाद, पालकमंत्री संजय शिरसाट तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, राजेंद्र जंजाळ मुर्दाबाद, अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणला.

शीतयुद्ध सुरूचमनपा निवडणुकीत युती करण्यावरून पालकमंत्री संजय शिरसाट विरोधात राजेंद्र जंजाळ असे चित्र होते. तेव्हापासून उभय नेत्यांतील शीतयुद्ध काही थांबले नसल्याचे गत बुधवारी झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत दिसून आले होते.

वरिष्ठांच्या आदेशाने निवडनिर्णय प्रक्रिया माझ्या एकट्याच्या हातात नाही. वरिष्ठांच्या आदेशाने शुभम काळे यांची नगरसेवकपदी नेमणूक करण्यात आली. ज्या प्रभागातून विनोद बनकर येतात, त्या प्रभागात चार नगरसेवक आहेत. काळे यांच्या प्रभागात पक्षाचा एकही नगरसेवक नाही. तेथे पक्षाची ताकद यामुळे वाढणार आहे. आमच्या पक्षात जातीयवादाला थारा नाही.- राजेंद्र जंजाळ, उपमहापौर तथा जिल्हाप्रमुख

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena infighting spills into open in Chhatrapati Sambhajinagar.

Web Summary : Shinde Sena's internal conflict surfaced in Chhatrapati Sambhajinagar over a corporator post. Supporters protested against district chief Rajendra Janjal after Vinod Bankar was overlooked. The appointment of Shubham Kale ignited the dispute, revealing ongoing tensions between factions.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरShiv Senaशिवसेना