शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

बालकाचा निर्र्घृण खून

By admin | Updated: May 3, 2016 01:04 IST

जालना : जमिनीच्या लोभातून चुलत्यानेच पुतण्याचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी मंठा चौफुली परिसरात घडली. सक्षम मनोज जोडीवाले (३) असे मृत बालकाचे नाव आहे.

जालना : जमिनीच्या लोभातून चुलत्यानेच पुतण्याचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी मंठा चौफुली परिसरात घडली. सक्षम मनोज जोडीवाले (३) असे मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी राखी जोडीवाले यांनी फिर्याद दिल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी जाफराबादेतून सातजणांना अटक केली. सक्षम व त्याची आई राखी हे दोघेही रविवारी अहिर गवळी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी औरंगाबाद येथून जालन्यात आले होते. राखी यांचे सासर जाफाराबाद असून, तेथील मंडळीही या सोहळ्याला आली होती. दरम्यान, सोहळ्यातून सायंकाळी पाचच्या सुमारास बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो आढळून आला नाही. त्यानंतर राखी जोडीवाले यांनी सदर बाजार पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही रात्रभर सक्षमचा शोध घेतला पण तो मिळाला नाही. सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास तालुका जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंठा चौफुली परिसरातील सिमेंट कम्पाउंडमध्ये सक्षमचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर परसिरातील रहिवाशांनी तालुका पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तालुका जालना पोलीस आणि सदर बाजार पोलिसांचे पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. सक्षमच्या डोक्यात मोठा दगड घातल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. राखी जोडीवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी रामेश्वर चुडामल जोडीवाले, मुकेश चुडामल जाडीवाले, श्रावण चुडामल जोडीवाले, सुरज हिरामन जोडीवाले, नितू रामेश्वर जोडीवाले, मुन्नीबाई चुडामल जोडीवाले (सर्व रा.जाफराबाद) यांना अटक केली आहे. तर हिराबाई गणेशलाल गोरक्षक फरार आहे.