शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईचे आदेश

By admin | Updated: May 12, 2014 00:01 IST

हिंगोली : वृद्धास कुर्‍हाडीसह दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने ९ पैकी ३ आरोपींना जखमीस ४ हजार ५00 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

हिंगोली : विहिरीचे पाणी नेण्याच्या कारणावरून वृद्धास कुर्‍हाडीसह दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने ९ पैकी ३ आरोपींना जखमीस प्रत्येकी १५00 रुपये असे एकुण ४ हजार ५00 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. सेनगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अ.दि. जवळकार यांनी ९ मे रोजी हा निकाल दिला. सेनगाव तालुक्यातील सुरजखेडा येथे ८ मे २00७ रोजी महादेव पुंजाजी मोरे (वय ६0) यांना ह्यतुझी पत्नी आमच्या विहिरीचे पाणी का नेते?ह्ण असे म्हणून नऊ जणांनी कुर्‍हाड व दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत महादेव मोरे यांचे नातेवाईक सुनील किशन मोरे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी गोरखनाथ सखाराम खिल्लारे, निंबाजी गणपत खिल्लारे, मच्छिंद्र सखाराम खिल्लारे, विलास काशिराम खिल्लारे (चौघे रा. आडगाव ता.जि. वाशिम), उत्तम रामजी जाधव, रामजी नामाजी जाधव, तातेराव रामजी जाधव, अरुण तातेराव जाधव, मनोहर कोंडबा भिसे (सर्व रा. सुरजखेडा ता. सेनगाव) यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हय़ाचा तपास करून आरोपींना अटक केली व त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला सेनगाव येथील न्यायालयात चालला. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे मोतीराम कुंडलिक मोरे, अर्जुन धोंडूजी मोरे, गजानन कांताराव मोरे, धम्मराज कुंडलिक मोरे, महादेव पुंजाजी मोरे (सर्व रा. सुरजखेडा) या सहा जणांची साक्ष नोंदविण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अ.दि. जवळकार यांनी साक्षपुरावे तपासून दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर ९ मे रोजी या खटल्याचा निकाल दिला. या खटल्यातील आरोपी उत्तम रामजी जाधव, तातेराव रामजी जाधव, मनोहर कोंडबा भिसे (रा. सुरजखेडा) यांना न्यायालयाने दोन वर्षांच्या चांगल्या वागणुकीच्या बंद पत्रावर सोडले असून जखमी महादेव मोरे यास त्यांनी प्रत्येकी १ हजार ५00 रुपये या प्रमाणे ४ हजार ५00 रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. इतर सहा आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड. शारदा भट्ट यांनी काम पाहिले.