शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

कुक्कूटपालनातून घेतले लाखाचे उत्पन्न

By admin | Updated: August 17, 2014 00:05 IST

बीड : शिक्षण घेऊन आपल्या मुलाने सरकारी नोकरदार बनावं, असे घरच्यांचे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न न पेलल्यामुळे आई-वडील खुप नाराज झाले. घरचे नाराज झालेल्याची जाणीव

बीड : शिक्षण घेऊन आपल्या मुलाने सरकारी नोकरदार बनावं, असे घरच्यांचे स्वप्न होते. मात्र हे स्वप्न न पेलल्यामुळे आई-वडील खुप नाराज झाले. घरचे नाराज झालेल्याची जाणीव त्याला झाली आणि त्याने स्वत:च्या हिमंतीवर कुक्कूटपालणाचा व्यवसाय उभारला. यामध्ये त्याला यशही आले आणि अवघ्या सहा महिन्यामध्ये त्याने लाखाचे उत्पन्न काढले.कालीदास रमेश आजबे हा मुळचा वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवाशी. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यांनतर इंजिनीअरींगचे शिक्षण जिल्ह्याचे ठिकाणी घेतले. काही कारणास्तव शिक्षणामध्ये कमी गुण मिळाले. याचा परिणाम घरच्यांवर आणि कालीदासवरही झाल्याचे स्पष्ट दिसून येत होते. घरच्यांचे रोजचे चिडणे, भांडणे असे प्रकार घडत राहिले. कालीदास हा संस्कारीत मुलगा असल्याने त्याला या सर्व गोष्टींची जाणीव होती. त्यामुळे त्याला घरच्यांचे बोलणे लागले. त्याने वर्षापूर्वी कुक्कूटपालण व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय उभारण्यासाठी भांडवल असणे आवश्यक होते. यासाठी इतरांपुढे हात पसरण्यापेक्षा कालीदासने आपल्या वडीलांकडेच मदत मागितली. वडीलांनी नकार दिला. मात्र आईने मध्यस्थी करीत कालीदासला ३० हजार रुपये दिले. यामध्ये त्याने सुरूवातीला ७०० गावरान कोंबड्या खरेदी केल्या. आता यांच्यामध्ये वाढ होऊन दीड हजारांजवळ कोंबड्यांची संख्या पोहचली आहे. वडीलांचे पैसे तर परत केलेच शिवाय लाख रुपयांचे उत्पन्नही वडीलांच्या हातावर ठेवले. सध्या या कोंबड्या व अंडे हे लोकल मार्केटला जात असल्याचे कालीदासने सांगितले. महिन्यातून तीन वेळेस कोंबड्यांना लसही दिली जाते. धनंजय कुलकर्णी, अंकूश आजबे यांच्या सहकार्यानेही हा व्यवसाय पुढे जात आहे. शासनाकडून काही तरी अनूदान मिळावे, अशी कालिदासची अपेक्षा आहे. कालिदासने सुशिक्षीत बेरोजगारांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्याचे कौतूक होत आहे. (वार्ताहर)