शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कार्डियाक केअर सेंटरचे उद्घाटन

By admin | Updated: August 31, 2014 00:42 IST

औरंगाबाद : कार्डियाक केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले.

औरंगाबाद : लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद क्लासिक व सुमनांजली नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या कार्डियाक केअर सेंटरचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. हृदयविकारासंदर्भातील ईसीजी टेस्ट करणाऱ्या रुग्णांसाठी या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद क्लासिकच्या वतीने नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. असाच एक उपक्रम क्लबच्या वतीने राबविण्यास सुरूवात झाली असून हृदयविकाराच्या रुग्णांना स्वस्तात ईसीजी रिपोर्ट देण्यात येऊन आजाराविषयीचे आॅनलाईन निदान केले जाणाार आहे. बंगळुरू येथील नारायणा हृदयालयाशी टायअप करून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रकल्पप्रमुख मिलिंद दामोधरे यांनी सांगितले. ज्या रुग्णांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांना या उपक्रमांतर्गत ४०० रुपयात मिळणारा ईसीजी रिपोर्ट फक्त ५० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच आॅनलाईन मोडेम इन्स्ट्र्युमेंटद्वारे बंगळुरू येथील नारायणा हृदयालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णाच्या उपचारासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. गरजू व गरीब रुग्णांसाठी हा उपक्रम अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.या उपक्रमाविषयी बोलताना ना. राजेंद्र दर्डा यांनी लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद क्लासिक व सुमनांजली नर्सिंग होमचे अभिनंदन केले. हा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असून रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे. बंगळुरू येथील हृदयविकारतज्ज्ञांकडून रुग्णांना आॅनलाईन पद्धतीने उपचार मिळणार असल्याने रुग्णांना शहरातच अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम शहरात राबविण्यात येत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. दर्डा यांनी उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले. सुमनांजली नर्सिंग होम येथे पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्याला लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद क्लासिकचे अध्यक्ष ला. किरण पहाडे, सचिव ला. भाऊसाहेब गवळी, कोषाध्यक्ष ला. राजेंद्र जैन, प्रकल्प प्रमुख ला. मिलिंद दामोधरे, डॉ. डेव्हिड, डॉ. मिलिंद देशपांडे, ला. राजेश राऊत, ला. तनसुख झांबड, ला. महावीर पाटणी, ला. एम.के. अग्रवाल, ला. रवींद्र खिंवसरा, ला. शांतीलाल छापरवाल, ला. सुनील ठोळे, ला. जितेंद्र संघवी, ला. दीपक मुंदडा, ला. गिरीश पांडे, ला. संदीप डोडल, शिरीश कंदी आदींसह क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती.