खाकी वर्दीवर खाकीचाच हात, औरंगाबादेत पोलिसानेच केली पोलिसांना धक्काबुक्की

By बापू सोळुंके | Published: September 17, 2022 06:59 PM2022-09-17T18:59:51+5:302022-09-17T19:00:15+5:30

रात्रीउशिरा पानटपरीजवळ थांबण्यास केला मज्जाव केल्याने आला राग

in Aurangabad the police were beaten up by the police | खाकी वर्दीवर खाकीचाच हात, औरंगाबादेत पोलिसानेच केली पोलिसांना धक्काबुक्की

खाकी वर्दीवर खाकीचाच हात, औरंगाबादेत पोलिसानेच केली पोलिसांना धक्काबुक्की

googlenewsNext

औरंगाबाद: ग्रामीण पोलीस दलातील एका काँन्स्टेबलनेच पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री साडेअकरा ते पावणे बारा वाजेच्या सुमारास मोंढा नाका येथील एका पानटपरीजवळ घडला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलीस काँन्स्टेबल साहेबराव बाबुराव विखारे (३७,रा. कैलासनगर), मजूरर विश्वजीत दगडू जाधव(रा.विष्णूनगर), अनिल खंडू गायकवाड अशी आराेपींची नावे आहेत. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने शहरातील सर्व दुकाने, हॉटेल्स आणि पानटपऱ्या रात्री ११च्या आत बंद करण्याचे निर्देश शहर पोलिसांना होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील टु मोबाईल व्हॅनचे पोलीस कर्मचारीसजनसिंग सुप्पडसिंग डोभाळ(४१) आणि अन्य सहकाऱ्यांसह मोंढा नाका येथे गेले. तेथील एका पानटपरीसमोर उभ्या लोकांना त्यांनी तेथे न थांबण्याचे आणि घरी जाण्याचे सांगू लागले. 

तेव्हा तेथे साध्या वेशात उभा असलेल्या आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विखारे हा दोन साथीदारांनाही तेथे न थांबण्याचे पोलिसांनी सांगितले. आपण पोलीस असूनही आपल्याला उभे राहू दिल्या जात नाही, हे पाहुन विखारेंना राग आला आणि त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तू मला ओळखले नाही, असे म्हणून त्याने डोभाळ यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहून अन्य पोलिसांनी त्यांना सोडविले. 

यावेळी झालेल्या झटापटीत डोभाळ यांच्या अंगावरील खाकी शर्टच्या गुंड्या तुटल्या,नेमप्लेट खाली पडली. यावेळी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. जनरल नाईट चेकींगला असलेले पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना हा प्रकार समजताच ते ठाण्यात गेले. त्यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा नाेंदविण्याचे निर्देश ड्युटी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सी.बी. ठुबे यांना दिले. याप्रकरणी आरोपी हवालदारासह त्याच्या दोन साथीदारांवर सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांना धक्काबुक्की करणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदविला. याप्रकरणी आरोपी पोलिसांवर अटकेची कारवाई केली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोपी हवालदार एका मंत्र्याच्या सुरक्षा पथकात
आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विखारे हा जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या सुरक्षा पथकात तैनात असल्याचे समोर आले आहे.

Web Title: in Aurangabad the police were beaten up by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.