शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या वर्गणीतून साकारतोय ‘आयएमए’ हॉल

By admin | Updated: July 1, 2014 00:12 IST

हिंगोली : व्याख्यानमालेपासून ते लग्नसोहळ्यापर्यंतच्या कार्यक्रमांसाठी हिंगोलीत नेहमीच सभागृहाची उणीव भासते. कितीही पैसे देण्याची तयारी केली असली डॉक्टर्स असोसिएशनला देखील अनेकदा सभागृह मिळाले नाही.

हिंगोली : व्याख्यानमालेपासून ते लग्नसोहळ्यापर्यंतच्या कार्यक्रमांसाठी हिंगोलीत नेहमीच सभागृहाची उणीव भासते. कितीही पैसे देण्याची तयारी केली असली डॉक्टर्स असोसिएशनला देखील अनेकदा सभागृह मिळाले नाही. परिणामी हिंगोलीतील डॉक्टरांनी एकत्र येवून संघटनेच्या माध्यमातून एखादे सभागृह उभारण्याचा विडा उचलला. आजघडीला ८०० स्क्वेअर फुट जागेतील पहिला मजला साकारला गेला. आगामी काळात बांधकाम पूर्ण होतच गरजूंना सामाजिक उपक्रमांसाठी अत्यल्प दरात सभागृह देण्याचा मानस ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्याने संघटनेने व्यक्त केला आहे.
१९६२ वर्षी डॉ. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर्स असोसिएशनची स्थापना झाली. संघटनेतील डॉ. वसंत भाले, डॉ. अशिष पातूरकर आाणि डॉ. श्रीपाल दोडल हे विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी आदर्श महाविद्यालयात जात होते. तपासणीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे डॉक्टरांना १ रूपया मिळत होता. सलग आठ वर्ष केलेल्या कामाची रक्कम खर्च न करता संघटनेच्या दृष्टीकोणातून प्लॉट विकत घेण्याचा विचार तिघांसमोर आला; परंतु पुरेशा पैशांअभावी आदर्श एज्युकेशन सोसायटीने १९६९ साली कमी दरात डॉक्टर्स असोसिएनसाठी प्लॉट दिला होता. दरम्यान १९७० पासून २००९ पर्यंत संघटनेकडून फारशे प्रयत्न झाले नाहीत. २००० वर्षानंतर कार्यक्रमांची रेलचेल वाढल्याने सभागृहाची उणीव भासत गेली. संघटनेला अनेकदा सभागृह मिळाले नाहीत. पुढील तीन वर्षांत संघटनेतील डॉ. सुर्यकांत घट्टे, डॉ. जयदीप देशमुख आणि डॉ. के. एच. गिरी यांनी सभागृह उभारण्याची संकल्पना मांडली. संघटनेच्या उपलब्ध जागेत सभागृह बांधता येत नव्हते. म्हणून जूना प्लॉट विकून बळसोंड भागात ८०० स्क्वेअर फुटाचा नवीन प्लॉट विकत घेतला; परंतु सभागृहाच्या बांधकामासाठी लागणारा भरमसाठ पैैसा संघटनेकडे नव्हता. बाहेरून मदत मिळण्याची आशा धूसर होती. आशात संघटनेची सूत्रे डॉ. किशन लखमावर आणि डॉ. गोपल कदम यांच्या हाती आली. सभागृहासाठी संघटनेतील डॉक्टरांकडून वर्गणी करण्याची योजना पुढे आली. मोठ्या प्रमाणात लागणारी रक्कम लोकवर्गणीतून जमा होणे शक्य नव्हते. संघटनेतील डॉक्टरांची संख्या पाहता क्लुप्ती लढविली. त्यात बांधकामासाठी घेतलेली रक्कम कालांतराने परत करण्याच्या करारावर वर्गणी जमा करण्याचे ठरविले. त्यातही किरायाच्या खोलीत दवाखाना चालविणाऱ्या डॉक्टरांना एकदाच लाखो रूपये देणेहे शक्य नव्हते. म्हणून एका लाखाच्या रक्कमेचे चार टप्पे करून निधी जमा करण्यास सुरूवात झाली. सुरूवातीला साडेतीन लाखांच्या रक्कमेतच भूमीपूजन करून पायाउभारणी करण्यात आली. दरम्यान सातत्याने लक्ष दिल्याने आजपर्यंत १८ लाख ५० हजारांचा निधी जमा झाला. त्या निधीतून आज पहिल्या मजल्यापर्यंत काम पूर्ण झाले आहे.
८०० स्क्वेअर फ्लॉटमध्ये प्रशस्त हॉल उभारण्यात येत आहे. सभागृहात लॉन टेनिसचा कोर्ट देखील उभारण्यात येत आहे. कार्यक्रमानिमित्य ऐणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात येत आहे. बाहेरगावातून येणाऱ्यांना निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी १२ खोल्या बांधण्यात येत आहेत.
सभागृहात जवळपास २०० लोक आरामाने बसू शकतील. लवकरच सभागृहाचे काम पूर्ण होणार आहे. संघटनेने उदात्त हेतू ठेवून सामाजिक उपक्रमासाठी गरजू लोकांना अत्यंत कमी दरात सभागृह देण्याचे सुतोवाच संघटनेचे अध्यक्ष डॉ. किशन लखमावार यांनी ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्याने केले आहे.
...म्हणून डॉक्टर्स डे
अमेरिकेत वैैद्यकीय शिक्षण घेतलेले बिदनचंद्र रॉय १४ वर्ष पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. देशात मोफत शस्त्रक्रिया आणि औषधोपचाराची संकल्पना त्यांनीच राबविली. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रत्येकाने आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ होण्याचा नारा त्यांनी दिला होता. दरम्यान एका आंदोलनात आजारी पडलेल्या महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिल्यामुळे विदेशी औषधी न घेण्याचा निर्धार त्यांनी केला. प्रकृती बिघडत गेल्याने बिदनचंद्र रॉय हे गांधीजीच्या उपचारासाठी दाखल झाले; मात्र गांधीजींनी स्वदेशीची आठवण करून देताच रॉय यांनी स्वातंत्र्यासाठी ४०० मिलीयन भारतीयांना हा विदेशी औषधोपचार आहे. हा खटाटोप भारतीयांसाठी म्हणून तुम्हाला असल्याचे सांगत गांधीजींचे वृत्त तोडीत त्यांना ठणठणीत केले. पुढे रॉय यांनी स्वत:चे घर देखील एका हॉस्पीटलला दान केले. १ जुलैै १८८२ साली जन्मलेले रॉय १ जुलैै १९६२ साली अनंतात विलीन झाले. त्यांच्या कार्याची आणि कृतज्ञतेसाठी आठवण म्हणून भारतात १ जुलै ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जात असल्याची माहिती डॉ. गोपाल कदम यांनी दिली.