वडवणी बीईओंचा बेकायदेशीर पदभार

By Admin | Updated: November 16, 2015 00:39 IST2015-11-15T23:31:43+5:302015-11-16T00:39:47+5:30

बीड : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील नियमबाह्य बदल्या, पदोन्नत्या, प्रभारी कार्यभाराचे किस्से संपायलाच तयार नाहीत.

Illegal charge of Wadvanite BE | वडवणी बीईओंचा बेकायदेशीर पदभार

वडवणी बीईओंचा बेकायदेशीर पदभार


बीड : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील नियमबाह्य बदल्या, पदोन्नत्या, प्रभारी कार्यभाराचे किस्से संपायलाच तयार नाहीत. वडवणी येथील गटशिक्षणाधिकारी पदाच्या खुर्चीचाही खेळही असाच रंगला आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी बी. के. नांदूरकर यांची पाटोदा येथे विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती आहे. मात्र, ते आदेश नसतानाही वडवणीत गटशिक्षणाधिकारी पदाच्या खुर्चीला चिकटून आहेत.
मे २०१४ मध्ये नांदूरकर यांची प्रशासकीय कारणावरून पाटोदा येथे बदली झाली होती. सप्टेंबर २०१४ मध्ये वडवणी येथील तत्कालिन विस्तार अधिकारी तुकाराम पवार व बाबा उजगरे यांच्यात आपापसात बदली झाली. त्यानुसार उजगरे वडवणीला रूजू झाले. त्याआधी नांदूरकर हे अंशत: बदलाआधारे वडवणीला रूजू झाले होते. शेख नज्मा या विस्तार अधिकारी तेथे आधीपासून होत्या. दोन पदे मंजूर असताना तेथे तिघे रूजू झाले. त्यामुळे वेतनाचाही तिढा निर्माण झाला. बीईओ निवृत्त झाल्यानंतर नांदूरकर यांच्याकडे प्रभारी पदभार आला. त्याला उजगरे यांनी विरोध केला होता.त्यानंतर तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांचा बदली आदेश सीईओ नामदेव ननावरे यांनी रद्द करीत नांदूरकर यांची बदली पुन्हा पाटोद्याला केली. मात्र, नांदूरकर हेच वडवणी येथे गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी कारभार पाहत आहेत. या संदर्भातील कारवाईची संचिका सीईओंकडे प्रलंबित आहे.
जावक क्रमांक एकच
नांदूरकर यांच्या बदलीचा व अंशत: बदलाचा जावक क्रमांक देखील एकच असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Illegal charge of Wadvanite BE