शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलाव दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 9, 2016 23:55 IST

विष्णू गायकवाड ल्ल गढी कोणत्याही गावास त्या-त्याठिकाणचे पाझर तलाव व धरणातील पाण्याचा मोठा आधार असतो. त्यावरच शेती व्यवसाय तग धरुन असतो.

गंभीर समस्या : गाळ उपसा नसल्याने पाणीसाठा होईनाविष्णू गायकवाड ल्ल गढीकोणत्याही गावास त्या-त्याठिकाणचे पाझर तलाव व धरणातील पाण्याचा मोठा आधार असतो. त्यावरच शेती व्यवसाय तग धरुन असतो. मात्र गेवराई तालुक्यातील गढी परिसरानजीक असलेल्या गोविंदवाडी व शिंदेवाडी पाझर तलावाची दुरवस्था झाली आहे. गाळ काढला नसल्यामुळे पाणीसाठा होत नाही. त्याचा फटका सध्या दुष्काळात शेतकऱ्यांना बसत आहे.अवर्षणाचे हे चौथे वर्ष आहे. थेंब-थेंब पाण्याचे महत्त्व प्रत्येक नागरिकाला दुष्काळामुळे पटू लागले आहे. त्यामुळे गावांगावामध्ये त्यांच्या भागातील साठवणूक करणाऱ्या तलाव, धरणाच्या स्थितीबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुष्काळापूर्वीच्या काळात तलावाची दुरुस्ती झाली असती तर आजच्या घडीला पाणीटंचाई फारशी गंभीर झाली नसती, अशी चर्चा गावांमध्ये सुरू आहे. गेवराई रस्त्यालगत असलेल्या गोविंदवाडी तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. या तलावातील गाळ उपसा व खोलीकरण केले तर त्याचा लाभ जवळपासच्या शेतीबरोबरच परिसरातील गावांना याचा लाभ होईल. तसेच जलस्त्रोत वाढण्यासही मोठी मदत होईल. या कामासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. तलाव उशाला आणि कोरड घशाला गोविंदवाडी व शिंदेवाडी तलाव परिसराला लागूनच असल्याने या तलावामध्ये पाण्याचा मोठे स्त्रोत उपलब्ध होवू शकत असतानाही याकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याबदल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेक वर्षापूर्वीचे या तलावाची व्यवस्थित देखभाल केली असती तर तलावामुळे अर्ध्या परिसराला पाणी टंचाई जाणवली नसती. या संदर्भात गेवराईचे तहसीलदार संजय पवार म्हणाले, दोन्हीही पाझर तलावांची पाहणी करून खोलीकरण व डागडुजी करण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील. गाळ उपसा नाही : शेती नाही ओलिताखालीगोविंदवाडी तलाव हा महामार्गाशेजारी असल्यामुळे तो पिकनिक स्पॉट होऊ शकतो. तलावाच्या परिसराचे सौंदर्यीकरण केले तर हा तलाव इतरांसाठी आकर्षण ठरू शकते. शिंदेवाडी व गोविंदवाडी तलावांची अनेक वर्षांपासून डागडुजी झालेली नाही. तसेच गाळ उपसा झाला नसल्यामुळे भरपूर क्षमता असतानाही अपेक्षित पाणीसाठा होत नाही.