शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ लेण्यांकडे ‘पुरातत्व’ विभागाचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 18, 2016 01:01 IST

मुजीब देवणीकर, औरंगाबाद भारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेण्यांकडे पाहिले जाते. युनेस्कोने १९८३ मध्ये अजिंठा व वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.

मुजीब देवणीकर, औरंगाबादभारतीय शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून वेरूळ लेण्यांकडे पाहिले जाते. युनेस्कोने १९८३ मध्ये अजिंठा व वेरूळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. वेरूळच्या लेण्या आजही संपूर्ण जगाला मोहिनी घालत आहेत. दरवर्षी सुमारे ४० लाखांहून अधिक देशी- विदेशी पर्यटक ऐतिहासिक औरंगाबादेत दाखल होतात. शहरात आलेला पर्यटक हमखास वेरूळ लेण्या पाहतोच. मात्र, मागील काही वर्षांपासून केंद्रीय पुरातत्व विभाग लेण्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध वारसाची दुरवस्था होत चालली आहे.औरंगाबाद शहरापासून अवघ्या ३० कि. मी. वरील खुलताबाद तालुक्यात वेरूळ गाव वसले आहे. सरळ रेषेत वसलेल्या एकूण ३४ लेण्यांमध्ये बौद्ध चैत्य दालने, प्रार्थना गृहे, विहार किंवा आश्रम, तसेच हिंदू आणि जैन मंदिरे यांचा समावेश आहे. पाचव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत लेण्या कोरण्यात आल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून लेण्या केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत. लेण्यांच्या देखभाल, दुरुस्तीकडे अजिबात लक्ष दिल्या जात नाही. अनमोल मूर्तीच्या सुरक्षेसाठी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. दोन महिन्यांपूर्वी एका चित्रपटाची शूटिंग लेण्यांच्या परिसरात करण्यात आली. कलाकार लेण्यांमधील विविध मूर्र्तींवर बसून शॉट देत होते. त्यापूर्वी लेण्याच्या परिसरात अवैध उपाहारगृह चालविण्यात येत होते. उपाहारगृहात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला होता. या स्फोटामुळे लेण्यांना तडा गेल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता.जागतिक वारसा दिनानिमित्त वेरूळ लेणीत ‘लोकमत’प्रतिनिधीने फेरफटका मारला असता अत्यंत विदारक चित्र जिकडे तिकडे पाहायला मिळाले. अनेक मूर्र्तींची तोडफोड करण्यात आली आहे. दगडांची हळूहळू झीज होऊन ते कोसळत आहेत. ३४ लेण्यांमधील अनेक मूर्र्तींचे हात-पाय गायब झाले आहेत. लेण्याच्या प्रवेशद्वाराजवळील मोठ्या हत्तींचीही तोडफोड करण्यात आली आहे. दगडांची पडझड होऊ नये यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून कोणत्याही खास उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.दौलताबाद, अजिंठा, वेरूळ, खुलताबाद, पाणचक्की कुठेही पर्यटकांनी पाय ठेवला तर अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळते. अनेक पर्यटनस्थळांवर तर पर्यटकांना उन्हाळ्यात पिण्यासाठी घोटभर पाणी मिळत नाही. शहरातील पर्यटनस्थळ पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांनी यावे तरी कसे, असा प्रश्न अनेकांना पडतो. जनशताब्दी ही एकमेव रेल्वे सोडली तर पर्यटकांना सोयीची एकही रेल्वे नाही. शहरात आलेले पर्यटक एक ते दीड दिवस थांबतात. त्यानंतर ते अन्य शहरांतील पर्यटनस्थळांकडे निघून जातात. जास्तीत जास्त पर्यटक शहरात थांबावेत, पर्यटन रोजगार वाढावा यासाठी ठोस असे प्रयत्नच झालेले नाहीत.वेरूळ, अजिंठा व इतर पर्यटनस्थळांची सोयीस्करपणे वाट लावण्याचे काम केंद्रीय पुरातत्व, राज्य पुरातत्व आणि एमटीडीसी करीत आहे. पर्यटन वाढावे यादृष्टीने कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. अनमोल वारसा जपण्यासाठी फारसे परिश्रम शासकीय यंत्रणांकडून घेतले जात नाही. त्यामुळे वेरूळ येथील मूर्र्तींची तोडफोड होत आहे. अखंड दगडांची झीज होऊन ते कोसळत आहेत.-महेंद्र ठोंबरे, उपाध्यक्ष, टुरिस्ट गाईड असोसिएशनऔरंगाबादेत येणाऱ्या पर्यटकांचा ओघवर्षे पर्यटक संख्या विदेशी पर्यटक२००६-०७१७,९१, ४६९६९,१५९२००७-०८२२,९५,४५९७६,८१६२००८-०९२५,१५,३४१५९,६१५२००९-१०२९,९९,४५८८०,३७९२०१०-११३५,१९,६५६८६,७२५२०११-१२ ३९,३७,६४५९१,१४२२०१२-१३४४,०९,९७८९६,९४४२०१३-१४३९,५१,०५२७६,५१६२०१४-१५३९,८९,७४१७७,३८५२०१५-१६३८,५५,०७७५४,०००