शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मीटर न बसविल्यास नळ कनेक्शन तोडणार

By admin | Updated: December 24, 2016 00:54 IST

लातूर : नागरिकांनी स्वत:हून नळाला मीटर बसविण्यासाठी आता २० जानेवारी २०१७ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

लातूर : नागरिकांनी स्वत:हून नळाला मीटर बसविण्यासाठी आता २० जानेवारी २०१७ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. या मुदतीत मनपाच्या नोंदणीकृत प्लंबरकडून मीटर बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर मनपा आपल्या मंजूर दरानुसार मीटर बसविणार आहे. त्याचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाईल. शिवाय, जे ग्राहक मीटर बसविणार नाहीत, त्यांचा पाणीपुरवठा बंद किंवा नळ कनेक्शन तोडले जाईल, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. महिनाभरापूर्वी मनपाने शहरातील नागरिकांना स्वत:हून नळाला मीटर बसविण्याचे आवाहन केले होते. मात्र या आवाहनाला सध्या तरी प्रतिसाद मिळाला नाही. शहरातील ४७ हजार ग्राहकांपैकी केवळ साडेतीनशे ग्राहकांकडे नळाला मीटर आणि तोट्या आहेत. उर्वरित ग्राहकांकडे तोट्याही नाहीत अन् मीटरही नाही. त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासनाने नळाला जलमापके बसविण्यासाठी परत आवाहन केले आहे. नोंदणीकृत प्लंबरकडून मीटर बसविण्याचे आवाहन केले आहे. २० जानेवारीनंतर ज्या ग्राहकांच्या नळाला मीटर बसविल्याचे दिसणार नाही, त्यांच्या नळांना महापालिकेच्या मंजूर निविदा दरानुसार मीटर बसविण्यात येणार आहे. त्याचा पूर्ण खर्च महापालिकेकडे भरणे संबंधित ग्राहकांना बंधनकारक राहील. अन्यथा ग्राहकांच्या नळपट्टी बिलातून सदर खर्च व्याजासह वसूल करण्यात येणार आहे. जर खर्च दिला नाही, तर संबंधित ग्राहकांचा पाणीपुरवठा बंद केला जाईल. शिवाय, नळ कनेक्शनही तोडण्यात येणार आहे. जलमापके बसविताना मीटरच्या मागील बाजूस व्हॉल्व बसविण्यात यावे तसेच मीटरच्या सुरक्षिततेसाठी फायबर / एचडीपीई प्रोटेक्शन बॉक्स (कुलूप लावण्याच्या सोयीसह) बसविण्यात यावे. नळाला पाणी येण्याची पूर्वसूचना देणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा वापरही ग्राहकांनी आपल्या स्तरावर करावा, असे आवाहनही महापालिका उपायुक्तांनी केले आहे. मीटर बसविण्याबाबतचा सर्व तपशील महापालिकेने डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.एमसीलातूर. ओआरजी या वेबसाईटवर प्रसिद्ध असून, तो नागरिकांना पाहता येणार आहे. (प्रतिनिधी)