पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

By Admin | Updated: May 17, 2016 00:04 IST2016-05-17T00:03:00+5:302016-05-17T00:04:31+5:30

हदगाव : उमरी (ज़) ता. हदगाव येथील इसमाने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केल्यानंतर गळफास लावून स्वत:लाही संपविले़ यामुळे चार मुलींचे मातृ-पितृ छत्र हरवले

Husband's suicide by killing his wife | पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

हदगाव : उमरी (ज़) ता. हदगाव येथील इसमाने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केल्यानंतर गळफास लावून स्वत:लाही संपविले़ यामुळे चार मुलींचे मातृ-पितृ छत्र हरवले व म्हाताऱ्या आईचा आधारही गेला़ या कृत्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली़ ज्या पतीने खून केला, त्याच्यासोबतच अंत्यसंस्कार घेण्याची वेळ पत्नीवर आली़
आठ दिवसांपूर्वीच हे कुटुंब सासरवाडी नायगाव येथून गावात आले़ दोघांत काय वाद झाला हे चंद्रकांतच्या आईला व मुलीलाही माहीत झाले नाही़ १५ मे रोजी रात्री तिन्ही मुली उकाड्यामुळे आजीसोबत अंगणात झोपल्या़ पती-पत्नी घरात होते़ कान्होपात्राला पतीच्या मनातील डाव कळालाच नाही़ झोपेत असताना चंद्रकांतने तिच्या मानेवर कुऱ्हाडीचा मोठा घाव घातला़ त्यानंतर दुसरा़ दोन घावातच कान्होपात्रा संपली़ त्या एका अंगावर झोपलेल्या स्थितीतच होत्या़ बाजेवर रक्ताचा डोह साचला़ भिंतीवर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या़ यानंतर काही वेळातच घराच्या पत्राखाली लाकडाला गळफास लावून चंद्रकांतने स्वत:लाही संपविले़ सकाळ झाली तरीही दार उघडले नसल्याने आजीने एका नातीला आईबाबांना उठव असे सांगितले़ प्रतिसाद मिळाला नसल्याने तिने दरवाजाच्या फटीतून पाहिले असता घटना उघडकीस आली. गावातील प्रतिष्ठित मंडळी, सरपंच, पोलिस पाटील, डॉ़ यु़ व्ही़ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक गोमारे यांनी पंचनामा करून प्रेतांची उत्तरीय तपासणी वायफना आरोग्य केंद्रात केली़ दुपारी ४ च्या दरम्यान पती-पत्नीवर उमरी (ज़) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ चारही मुलींच्या आक्रोशाने उपस्थितांचे हृदय हेलावले़ खुनी चंद्रकांत याच्या गळ्यामध्ये पाच ते सहा चिठ्ठ्या आढळल्या़ मात्र त्यातील मजकूर कळाला नाही़
एकूणच या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे़ ६५ वर्षांची आई, १३, ६ व ३ वर्षाच्या मुलींचे आयुष्य या पित्याने किरकोळ कारणामुळे उद्ध्वस्त केले़

Web Title: Husband's suicide by killing his wife