शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांच्या मुुला- मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा

By admin | Updated: May 9, 2014 00:16 IST

अंबाजोगाई: गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा येथे मोठ्या थाटात पार पडला.

 अंबाजोगाई: गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी रोटरी क्लब आॅफ तळेगाव दाभाडे व शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गुरूवारी १३ जोडप्यांचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा येथे मोठ्या थाटात पार पडला. अंबाजोगाई व परिसरात दीड महिन्यापूर्वी झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांपुढे आपल्या मुला-मुलींचे विवाह कसे करायचे? हा प्रश्न होता. ही गरज ओळखून सर्वधर्मीय सामुदायिक सोहळा घेण्याचा निर्णय झाला. या विवाह सोहळ्यात ११ हिंदू जोडपी विवाहबद्ध झाली. या जोडप्यांना गॅस कनेक्शनसह संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या विवाह सोहळ्यास १० हजारांपेक्षाही जास्त वºहाडी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. द्वारकादास लोहिया, नंदकिशोर मुंदडा, रोटरीचे प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर, प्रफुल्ल मिरजगावकर, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, अप्पर अधीक्षक एम. पी. कराडे, उपनगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अंकुशराव काळदाते, शिवाजी कुलकर्णी, प्रा. संगीता ठोंबरे आदी उपस्थिती होते. सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, प्रसाद चिक्षे, वैजनाथ देशमुख, सूर्यकांत मोहरीर, रोटरीचे अध्यक्ष बाबूराव बाभुळगावकर, जगदीश जाजू, डॉ. सुरेश आरसुडे, डॉ. डी. एच. थोरात, भागवत कांबळे, मनोज लखेरा यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर) सवाद्य वरात सकाळी ८ वाजल्यापासूनच विवाह सोहळ्याची लगबग सुरू होती. सर्व वधुवरांची मिरवणूक बँड पथकासह व फटाक्यांच्या आतषबाजीत शहरातून निघाली. वºहाडींसाठी गोडधोड जेवणाची सोय केली होती.