मानव विकास निर्देशांक पाहणीला ‘ब्रेक’; २०११ च्या जणगणनेनुसारच होतोय उपाययोजनांचा विचार

By विकास राऊत | Published: May 11, 2023 03:53 PM2023-05-11T15:53:23+5:302023-05-11T15:55:12+5:30

जनगणना न होण्याचे कारण; मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील ३० तालुक्यांचा समावेश

Human Development Index Survey 'Break'; The measures are being considered according to the 2011 population census | मानव विकास निर्देशांक पाहणीला ‘ब्रेक’; २०११ च्या जणगणनेनुसारच होतोय उपाययोजनांचा विचार

मानव विकास निर्देशांक पाहणीला ‘ब्रेक’; २०११ च्या जणगणनेनुसारच होतोय उपाययोजनांचा विचार

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मानव विकास निर्देशांक पाहणीला जनगणना न झाल्यामुळे ब्रेक लागलेला आहे. नव्याने जनगणना होईल, तेव्हा विभागातील मानव विकास निर्देशांक पाहणी होईल, असे येथील आयुक्तालय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे २०११ च्या जनगणनेनुसार केलेल्या सामाजिक, आर्थिक पाहणीच्या सूत्रावरच मराठवाड्यात उपाययोजनांचा विचार होत आहे.

शिक्षण, आरोग्य, दरडोई उत्पन्न या सूत्रांवर मानव विकास निर्देशांक ठरतो. मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर आणि उस्मानाबाद वगळता उर्वरित नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि बीड या पाच जिल्ह्यांतील सुमारे ३० तालुक्यांतील निर्देशांकानुसार गरिबातील गरिबांना आर्थिक सहकार्य करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न आयुक्तालयातून होत आहेत; परंतु जनगणना न झाल्यामुळे विभागाचे दरडोई उत्पन्न, आरोग्य आणि शिक्षणाची गेल्या दहा वर्षांतील बदललेली परिस्थिती रेकॉर्डवर आलेली नाही.

कधी झाली स्थापना?
दि. २९ जून २००६ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील अतिमागास जिल्ह्यांतील मानव विकास निर्देशांक उंचावण्याकरिता या मिशनची स्थापना करण्यात आली. २०११ साली २३ जिल्ह्यांतील १२५ तालुक्यांत मानव विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय झाला. २०१९ पासून २०२३ पर्यंत ९६९ कोटी रुपयांची तरतूद शासनाने आयुक्तालयासाठी केली. त्यांपैकी ६७९ कोटी रुपयांचे अनुदान दिले.

यावरून ठरतो निर्देशांक
जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार साक्षरता, प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटनोंदणी, अर्भक जीवित दर, जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नानुसार निर्देशांक ठरतो. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक कमी आहे. दोन जिल्हे मध्यम स्तरावर तर एकच जिल्हा उच्च श्रेणीत आहे. विभागातील ७६ तालुक्यांचा निर्देशांक काढण्याचे सध्या सुरू आहे.

निर्देशांकांची जिल्ह्यांची स्थिती
कमी निर्देशांक असलेले जिल्हे: हिंगोली--- ०.६४८, उस्मानाबाद---०.६४९, नांदेड----०.६५७, जालना----०.६६३, लातूर-----०.६६३
मध्यम निर्देशांक असलेले जिल्हे: बीड---०.६७८; परभणी----०.६८३
उच्च निर्देशांक असलेले जिल्हे: औरंगाबाद----०.६५

राज्यात आरोग्य, उत्पन्न, शिक्षणात जिल्ह्याचा रँक किती?
जिल्हा.......शिक्षणरँक..........आरोग्यरँक........उत्पन्नरँक........
औरंगाबाद----२५ वा ----- १८ वा ------- १० वा
हिंगोली-------३२ वा ----- २४ वा ------- २९ वा
उस्मानाबाद---२८ वा ----- २५ वा ------- ३१वा
नांदेड---२९ वा ----- ८ वा ------- ३० वा
जालना----३१ वा ----- २२ वा ------- २६ वा
लातूर----१९ वा ----- २७ वा ------- ३२ वा
बीड---२६ वा ----- १० वा ------- २५ वा
परभणी----२७ वा ----- २६ वा ------- २१ वा
स्रोत : मानव विकास निर्देशांक २०११

Web Title: Human Development Index Survey 'Break'; The measures are being considered according to the 2011 population census

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.