शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

हडकोत आठ लाखांची धाडसी घरफोडी

By admin | Updated: November 25, 2014 01:01 IST

औरंगाबाद : हडको एन- ११ परिसरातील पाथ्रीकरनगरात रविवारी सायंकाळी एक घर फोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये रोख आणि अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने

औरंगाबाद : हडको एन- ११ परिसरातील पाथ्रीकरनगरात रविवारी सायंकाळी एक घर फोडून चोरट्यांनी साडेपाच लाख रुपये रोख आणि अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, असा आठ लाखांचा ऐवज चोरून नेला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. कैलास सांडू पाथ्रीकर हे आपल्या कुटुंबासमवेत पाथ्रीकरनगरात राहतात. रविवारी सायंकाळी त्यांची मुलगी हडकोत मामाच्या घरी गेली, तर पत्नी नातेवाईकांकडे गेली. त्यानंतर पाथ्रीकर हेसुद्धा हडको कॉर्नर येथे कटिंग करण्यासाठी गेले. जाताना त्यांनी केवळ घराच्या मुख्य दरवाजालाच कुलूप लावले. स्वयंपाक खोलीचा मागील दरवाजा बंद करायला ते विसरले. हे कुटुंब घरातून बाहेर पडताच मागील दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरटे घरात घुसले. त्यांनी कपाटात असलेले साडेपाच लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने उचलले आणि धूम ठोकली. या चोरीप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.