शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

हॉर्नच्या डेसिबलची होणार तपासणी

By admin | Updated: June 30, 2014 00:39 IST

जालना : रूग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब, पोलिस वाहनांसह इतर शासकीय वाहनांना लावण्यात आलेल्या सायरन किंवा मल्टीटोन हॉर्नच्या नियमवलीत राज्य सरकारने बदल केला आहे.

जालना : रूग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब, पोलिस वाहनांसह इतर शासकीय वाहनांना लावण्यात आलेल्या सायरन किंवा मल्टीटोन हॉर्नच्या नियमवलीत राज्य सरकारने बदल केला आहे. आदेशानुसार या वाहनांची ध्वनीमर्यादा तपासण्यात येणार आहे. मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरील हॉर्न काढण्याचे तसेच त्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचनाही सरकारने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अनेकवळा रूग्णवाहिकेचे वाहनचालक हॉर्नचा दुरूपयोग करून शहरातून भरधाव वेगाने सायरन वाजवत जातात. त्यामुळे ध्वनीप्रदूषण होतेच, शिवाय अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळेच रुग्णवाहिकेसह अग्निशमन दल, आपत्ती निवारणादरम्यान वापरण्यात येणारी वाहने, पोलिस अधिकारी, बांधकाम साहित्याची वाहतूक करणारी वाहने मोटार वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनांवर लावण्यात येणारे सायरनची संहिता विहित करण्यात आली आहे. यानुसार सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेल्या वाहनांनी निर्देशीत केलेल्या ध्वनीच्या मर्यादेतच त्याचा वापर करावा, पोलिस व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करून खात्री करावी, वाहनांनी ध्वनीच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास अशा वाहनांवरून असे सायरन काढून टाकण्यासह विविध नियमांसह योग्य ही कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय वाहनांना सायरन वापराच्या नियमावलीनुसार पोलिसांनी सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेली शासकीय वाहने, रुग्णवाहिका, आपत्कालीन स्थितीत वापरण्यात येणारी वाहनांच्या मागणी शिवाय खाजगी वाहनांनी सायरन व मल्टीटोन हॉर्नचा वापर करू नये, असेही निर्देश दिले आहेत.दरम्यान, या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सांगितले की, या नियमाची काटेकारपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. खाजगी वाहने सायरनचा वापर करतांना आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. रूग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांसह इतर वाहनांवरील सायरन किंवा मल्टीटोन हॉर्न प्रमाणित करून घ्यावेत. (प्रतिनिधी)अतिआवाजामुळे नागरिकांना त्रासया आदेशानुसार सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेल्या शासकीय वाहनांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये रात्री दहा ते सकाळी ६ या वेळेमध्ये हॉर्नचा वापर करू नये. अतिशय आपत्कालीन परिस्थितीव्यतिरिक्त शहराच्या हद्दीबाहेरील सार्वजनिक रस्त्यांवर वापर करता येईल, आदेशात नमूद केले आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी सायरन व मल्टीटोन हॉर्न बसविलेलया अ‍ॅम्बुलन्सला योग्य तो स्टीकर द्यावा. रूग्णांच्या नातेवाईकांकडून मागणी आल्याशिवाय रुग्णवाहिकांनी सायरन व मल्टीटोन हॉर्नचा वापर करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे.