हिंगोलीचे शिरसे बीडला

By Admin | Updated: February 8, 2015 00:11 IST2015-02-07T23:52:27+5:302015-02-08T00:11:58+5:30

बीड : राज्याच्या महसूल विभागाने शनिवारी जिल्हा परिषदेत मोठे फेरबदल केले. शिवाय हिंगोलीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. शिरसे हे बीडला आले आहेत.

Hingoli Shirsay Beedla | हिंगोलीचे शिरसे बीडला

हिंगोलीचे शिरसे बीडला

बीड : राज्याच्या महसूल विभागाने शनिवारी जिल्हा परिषदेत मोठे फेरबदल केले. शिवाय हिंगोलीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. शिरसे हे बीडला आले आहेत.
बीड जि.प. च्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. भारती यांची स्वच्छता व पाणीपुरवठा विभागात बदली झाली. भारतींच्या जागी हिंगोलीहून आलेले शिरसे काम पाहतील. स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. एम. ढोकणे यांना बीडच्या गटविकास अधिकारीपदाची जबाबदारी सोपविली. सोमवारी बदलीच्या ठिकाणी हे सर्व अधिकारी रुजू होतील. गेल्या काही महिन्यांपासून गटविकास अधिकारीपदाच्या अनेक जागा रिक्तच आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Hingoli Shirsay Beedla