ब्रिजवाडीत उच्च दाबाची तार तुटली

By Admin | Updated: November 29, 2014 00:31 IST2014-11-29T00:12:36+5:302014-11-29T00:31:04+5:30

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीतील ब्रिजवाडी रोडवर सकाळी मोठा धमाका झाला अन् दिवाळीतील फटाक्यांच्या आवाजाप्रमाणे धडाडधूम आवाजाने आगीचे गोळे उडू लागले.

High pressure wire broke in the bridge | ब्रिजवाडीत उच्च दाबाची तार तुटली

ब्रिजवाडीत उच्च दाबाची तार तुटली

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसीतील ब्रिजवाडी रोडवर सकाळी मोठा धमाका झाला अन् दिवाळीतील फटाक्यांच्या आवाजाप्रमाणे धडाडधूम आवाजाने आगीचे गोळे उडू लागले. कारण उच्च दाबाची तार तुटून खाली पडली होती. नियंत्रण कक्षाला फोन गेला अन् अग्निशामक विभाग आणि सिडको पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले.
पहाटे पायी फिरण्यासाठी जाणारे, कारखान्यातून घरी येणाऱ्या किंवा कामाला निघालेल्या कामगारांची मोठी तारांबळ उडाली. जादा क्षमतेच्या वीजपुरवठ्याची तार असल्याने पाणी मारणे धोकादायक झाले होते. महावितरणच्या कार्यालयाशी पोलिसांनी संपर्क साधला; परंतु त्या ठिकाणी अधिकारी नव्हते. अखेर नागरिकांनी कार्यालय गाठून एका कर्मचाऱ्यास सोबत घटनास्थळी आणल्यानंतर विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. दुपारी २ वाजेनंतर या भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला. सहायक फौजदार बाबर खान, पोहेकॉ. पी.डी. पवार, एस. आर. पाटील, अरुण फोलाणे आणि अग्निशामक विभागाचे डी. डी. साळुंके, नईम पठाण, एस. आर. मोहाळ, वाहनचालक झाडे यांनी घटनास्थळी दुर्घटना होऊ नये म्हणून तीन तास खडा पहारा दिला.

Web Title: High pressure wire broke in the bridge