शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

१ मे पासून हेल्मेटसक्ती

By admin | Updated: March 28, 2016 00:22 IST

संजय तिपाले , बीड वाढत्या अपघातांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी १ फेबु्रवारीपासून औरंगाबादमध्ये हेल्मेटसक्ती लागू केली होती. त्या पाठोपाठ जिल्ह्यातही याची काटेकोर अमंलबजावणी केली जाणार असून,

संजय तिपाले , बीडवाढत्या अपघातांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी १ फेबु्रवारीपासून औरंगाबादमध्ये हेल्मेटसक्ती लागू केली होती. त्या पाठोपाठ जिल्ह्यातही याची काटेकोर अमंलबजावणी केली जाणार असून, त्यासाठी १ मे चा मुहूर्त ठरला आहे. हेल्मेटबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी पोलिसांतर्फे लवकरच विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.जिल्ह्यात दरवर्षी अपघातामुळे बळी पडणाऱ्यांची संख्या साडेतीनशे ते चारशे इतकी आहे. गतवर्षी अवैध वाहतुकीसह नियम डावलणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवायांचा बडगा उगारला. त्यामुळे २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये ४२ अपघातबळी कमी करण्यात पोलिसांना यश आले. औरंगाबादमध्ये हेल्मेटसक्तीमुळे चांगले परिणाम पुढे आले आहेत.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू पडलेल्यांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक असल्याचे निष्पन्न झाले. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी रविवारी आढावा बैठकीत अपघातीमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना सूचवितानाच हेल्मेटसक्तीकडेही लक्ष वेधले. त्यानुसार महाराष्ट्र दिनी १ मे पासून दुचाकीस्वारांना हेल्मेट अनिवार्य करण्याचा निर्णय झाला. धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ व कल्याण विशाखापट्टणम् महामार्ग क्र. २२२ या दोन महामार्गांसह बीड - अहमदनगर व केज- कळंब राज्य रस्त्यांवर ही सक्ती लागू असेल. दुचाकीवर पाठमागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट घालावे लागणार आहे. दरम्यान, शहरात वाहतूक पोलीस थांबत असलेल्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी (पॉइंट) दंड आकारला जाईल. महामार्गांवर देखील पोलीस निगराणी ठेवतील.हेल्मटविक्रेत्यांना सुगीचे दिवस१ मे पासून हेल्मटे सक्ती लागू होणार असल्यामुळे हेल्मेट विक्रेत्यांना सुगीचे दिवस येणार आहेत. ४०० पासून ते तीन हजार रूपयापर्यंतचे हेल्मेट उपलब्ध आहेत. काहींकडे आधीच हेल्मेट उपलब्ध आहेत; परंतु ते अडगळीला पडलेले होते. ते देखील आता बाहेर निघणार आहेत.हेल्मेट न घालता दुचाकी चालविताना आढळल्यास मोटार वाहन कायदा १२९/१७ अन्वये शंभर रुपयांचा दंड भरावा लागेल. जेवढ्या वेळेस दुचाकीस्वार विनाहेल्मेट वाहन चालवित असेल तेवढ्या वेळी त्याला दंड भरावा लागणार आहे.जिल्ह्यात दुचाकी वाहनांची संख्या दीड लाखांवर आहे. दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट घालावे लागणार आहे. त्यामुळे तीन लाख हेल्मटेची आवश्यकता बसणार आहे.४नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्यांना वाहन विके्रत्यांमार्फतच हेल्मेट देणे बंधनकारक केले असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. खान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.