शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ महिन्यांच्या बाळासह १५ जणांना उष्माघाताचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:50 IST

१२ जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार, आरोग्य विभागाकडून हाय अलर्ट जारी.

छत्रपती संभाजीनगर : तापमानाचा पारा ४३ अंशावर गेल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत दोन दिवसांत सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या उष्माघाताच्या १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर ग्रामीण रुग्णालयामध्ये ६ महिन्यांच्या बाळासह तिघांना उष्माघाताची लक्षणे आढळून आल्याची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतली आहे.

देवगाव रंगारी येथील ६ महिन्यांच्या मुलीची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी बुधवारी दुपारी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी औषधोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला घाटीत रेफर करण्यात आले; परंतु सदर मुलगी घाटीत दाखल झालेली नाही, अशी माहिती घाटीतील डाॅक्टरांनी दिली. गेल्या आठवडाभरात पाचोड येथील दोघांना उष्माघाताची लक्षणे आढळली. त्यांच्यावर पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोघांनाही रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली, तर २७ व २८ एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांत सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या उष्माघाताच्या १२ रुग्णांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

खाजगी रुग्णालयांतही रुग्णउष्माघात, डोकेदुखी, अशक्तपणा, उलट्या, जुलाब यासारख्या तक्रारी घेऊन खाजगी रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ‘ऊन लागले’, ‘उन्हाळी लागली’ असे रुग्णांकडून डाॅक्टरांना सांगितले जाते.

ही घ्या काळजी- दुपारी १२ ते ४ दरम्यान शक्यतो बाहेर पडणे टाळावे.- भरपूर पाणी, ताक, लिंबूपाणी, फळांचा रस घ्यावा.- डोक्यावर टोपी, रुमाल वापरावा.- हलके व सैल कपडे परिधान करावेत.

सर्व सौम्य उष्माघाताचे रुग्णग्रामीण रुग्णालयातील तिन्ही रुग्ण हे सौम्य उष्माघाताचे आहेत. घाटीत रेफर करण्यात आलेल्या मुलीला कुटुंबीयांनी घरी नेले. आम्ही तिच्या फाॅलोअपमध्ये आहोत. तिची प्रकृती चांगली आहे.- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक

सर्व रुग्णांना सुटीप्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार केलेल्या सर्व १२ रुग्णांना सुटी देण्यात आली. हे सर्व सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या उष्माघाताचे रुग्ण होते.- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

तालुका हाय उष्माघातसदृश रुग्णतालुका- रुग्णसंख्या

कन्नड-१पैठण- ४

फुलंब्री-३वैजापूर-२

खुलताबाद-१सिल्लोड-२

गंगापूर-१छत्रपती संभाजीनगर-१

English
हिंदी सारांश
Web Title : Heatwave Hits Aurangabad: 15 Suffer Heatstroke, Including 6-Month-Old Baby

Web Summary : Aurangabad faces a heatwave with temperatures soaring to 43°C. Fifteen people, including a 6-month-old, have suffered heatstroke. Cases reported across primary health centers and rural hospitals. Doctors advise precautions: stay hydrated, avoid midday sun, and wear light clothing to avoid heatstroke.
टॅग्स :Heat Strokeउष्माघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर