लग्नाचे वचन देऊन एकीसोबत संबंध ठेवून दुसरीसोबत लग्न; तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 20:12 IST2019-05-16T20:05:53+5:302019-05-16T20:12:07+5:30

पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

Having a relationship with one by giving a marriage pledge and getting married with other; Rape case filed against youth | लग्नाचे वचन देऊन एकीसोबत संबंध ठेवून दुसरीसोबत लग्न; तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

लग्नाचे वचन देऊन एकीसोबत संबंध ठेवून दुसरीसोबत लग्न; तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

ठळक मुद्देपीडितेची आरोपीसोबत जुनी ओळख आहे.१४ एप्रिल रोजी युवकाने दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न केले

औरंगाबाद : लग्नाचे वचन देऊन तीन वर्षांपासून विधवेसोबत राहणाऱ्या तरुणाने तिला सोडून दुसरीसोबतच लग्न करणाऱ्या नवरदेवाविरोधात जवाहरनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. 

गोविंद ऊर्फ अजय रावसाहेब आहेर (रा. लालखंडाळा, ता. वैजापूर) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. गारखेडा परिसरातील रहिवासी विधवा पीडितेची आरोपी गोविंद ऊर्फ अजय याच्यासोबत जुनी ओळख आहे. साडेतीन वर्षांपासून त्याने तिच्यासोबत प्रथम मैत्रीचे नाते निर्माण केले. नंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने तिला लग्न करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. लग्न न केल्यास तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करील, असे पीडितेने त्याला बजावले असता त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

दरम्यान १४ एप्रिल रोजी त्याचे दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न असल्याची माहिती पीडितेला समजल्यानंतर तिने जवाहरनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र तुम्ही वैजापूर येथे तक्रार करा, असे म्हणून पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून घेतली नव्हती. त्यामुळे पीडितेने १३ मे रोजी पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर १४ मे रोजी जवाहरनगर पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून घेऊन आरोपी गोविंद ऊर्फ अजय आहेरविरोधात बलात्कार करणे आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविला. आरोपीचा शोध सुरू केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी दिली.

Web Title: Having a relationship with one by giving a marriage pledge and getting married with other; Rape case filed against youth