तिजोरी फोडण्याच्या प्रयत्नाची ‘हॅटट्रीक’

By Admin | Updated: March 4, 2015 00:24 IST2015-03-04T00:14:00+5:302015-03-04T00:24:28+5:30

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सोमवारी रात्री केला.

The hattrick's attempt to break the safe | तिजोरी फोडण्याच्या प्रयत्नाची ‘हॅटट्रीक’

तिजोरी फोडण्याच्या प्रयत्नाची ‘हॅटट्रीक’


कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सोमवारी रात्री केला. हा प्रयत्न असफल झाल्याने ७ लाखांची रक्कम चोरी जाण्यापासून वाचली मात्र चोरट्यांनी जाताना बँकेतील दोन संगणक व इतर साहित्य चोरुन नेले. विशेष म्हणजे, यापूर्वी दोन वेळा बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला होता. चोरीचा प्रयत्न पूर्वी होऊनही बँक प्रशासनाने कोणतीही उपाय योजना केली नसल्याचे पोलिसांच्या तपासणी दरम्यान समोर आले.
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. सोमवारी रात्री बँकेच्या शटरचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहायाने तोडून आत प्रवेश केला. तेच गॅस कटर बँकेमध्ये नेले. तेथील तिजोरी गॅस कटरच्या साहायाने फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिजोरी तुटली नाही. त्यामुळे सुदैवाने, तिजोरीमधील सात लाख वाचले. चोरट्यांनी रिकाम्या हाताने न जाता बँकेतील दोन संगणक व साहित्य चोरुन नेले. याची माहिती मंगळवारी सकाळी चकलंबा पोलिसांना देण्यात आली. पंचनाम्यापूर्वी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच पोलिसांची वस्तुवरील फिंगरप्रिंट घेतले आहेत. या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय दिलीप तेजनकर करीत आहेत. दरम्यान, पंधरा दिवसापूर्वीच असाच प्रयत्न झाला होता.
चोरट्यांचे पोलिसांना आव्हान
तिच बँक, तोच प्रकार, तशीच पद्धत. असा प्राथमीक संशय पोलिसांना येत आहे. हे काम एकाच टोळीद्वारे केले जात आहे काय ?असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. पहिल्या दोन चोऱ्यांचा तपास लागला नसल्याने चोरट्यांना एका प्रकारे अभय मिळाले आहे. त्यामुळेच तिसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. चोरट्यांनी पोलिसांना जणू आव्हानच दिले आहे. किरकोळ चोरी असल्याचे माणून पोलीस तपासाला दिरंगाई करत आहे काय ? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला .

Web Title: The hattrick's attempt to break the safe