शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

शहरांची तंटामुक्ती केवळ कागदावरच

By admin | Updated: June 19, 2014 00:20 IST

उस्मानाबाद : शहरे तंटामुक्त करण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेले नियोजन कागदावरच राहिले असून, प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबादेतही अल्पप्रतिसाद मिळाला आहे़

उस्मानाबाद : शहरे तंटामुक्त करण्यासाठी शासनाकडून करण्यात आलेले नियोजन कागदावरच राहिले असून, प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबादेतही अल्पप्रतिसाद मिळाला आहे़ सहा वर्षात उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यांतर्गत तिन्ही गावे तंटामुक्त असून, उस्मानाबाद ग्रामीण, बेंबळी, ढोकी पोलिस ठाण्यांतर्गतही मोहीम थंडावली आहे़ चारही ठाण्यांतर्गतच्या १४० पैकी १०७ गावे तंटामुक्त झाली असून, उर्वरित गावेही तंटामुक्त करण्याची गरज आहे़राज्य शासनाच्या वतीने सन २००७ पासून सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला उस्मानाबाद शहर, ग्र्रामीण, बेंबळी, ढोकी या पोलिस ठाण्यांतर्गत प्रारंभीच्या चार वर्षात मोठा प्रतिसाद मिळाला़ गावातील तंटे गावातच मिटू लागल्याने व गावच्या विकास कामांसाठी बक्षीसरूपी निधी मिळू लागल्याने गावो-गावच्या ग्रामस्थांनी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला़ या मोहिमेत उस्मानाबाद शहर ठाण्यांतर्गतच्या चार पैकी सहा वर्षात तीन, उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत ४५ गावांपैकी २४, बेंबळी पोलिस ठाण्यांतर्गतच्या ४७ पैकी ३५, ढोकी पोलिस ठाण्यांतर्गतच्या ४४ पैकी २५ गावे तंटामुक्त झाली आहेत़ दरम्यान, तंटामुक्त झालेल्या गावांना शासनाच्या वतीने एक लाखापासून दहा लाखापर्यंतची लोकसंख्येवर आधारित बक्षीस रक्कम मिळाली आहे़ बहुतांश गावातील समित्यांनी या निधीचा खर्च नियमानुसार गावच्या विकासासाठी खर्च करण्यात आले असून, यामुळे गावा-गावांचा कायापालट झाला आहे़ मात्र, उर्वरित ३३ गावे तंटामुक्त करण्यासह तंटामुक्त गावातील शांतता कायम ठेवण्याकडे संबंधित गावच्या समिती पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे़बक्षिसाची प्रतीक्षा कायममहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या सहाव्या वर्षी सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यातील २९ गावे तंटामुक्त झाली आहेत़ मोहिमेच्या सातव्यावर्षीचे सन १०१३-१४ प्रस्ताव मागविण्यात आलेले असून, अद्यापही गतवर्षीच्या तंटामुक्त गावांना पारितोषिके देण्यात आलेली नाहीत़ शासनाच्या या लालफिती कारभारामुळे बक्षीसपात्र गावातील समित्यांमध्ये नाराजी आहे़आघावांची कामगिरी कौतुकास्पदढोकी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अविनाश आघाव यांनी जिल्ह्यात या मोहिमेला गती देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे़ पहिल्या वर्षी सन २००७-०८ मध्ये एक गाव तंटामुक्त झाले होते़ मात्र, नंतर दुसऱ्या वर्षी सन २००८-०९ मध्ये आघाव यांच्या प्रयत्नातून तब्बल १२ गावे तंटामुक्त झाली आणि जिल्ह्यात मोहिमेला मोठी गती मिळाली़तंटामुक्त गावात तंटेगत सहा वर्षात तंटामुक्त झालेल्या अनेक गावात आजही मोठ्या प्रमाणात तंटे उद्भवत आहेत़ बक्षीस मिळेपर्यंत काम करणाऱ्या समित्यांसह गावातील पुढाऱ्यांनी ‘स्व’ राजकारण सुरू केल्याने तंटे मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत़ ना अधिकाऱ्याचा, ना कर्मचाऱ्याचा सन्मानमहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावा-गावात यशस्वी करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न मोठे आहेत़ त्यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील शेकडो गावे तंटामुक्त झाली असून, कोट्यवधी रूपयांचा निधी गावांच्या विकास कामासाठी मिळाला आहे़ मात्र, तंटामुक्तीचे उत्कृष्ठ काम केल्याने शासनाकडून अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांचा साधे प्रमाणपत्र देवूनही गौरव केला जात नाही, ही खेदाची बाब आहे़पोलिसांच्या खांद्यावर ओढे...गृहविभागाकडून ही मोहीम राबविली जात असली तरी मोहिमेला मूर्त रूप देण्यासाठी राज्य शासनाने पोलिस प्रशासनासह, जिल्हाधिकारी (महसूल), जिल्हा परिषद या तिन्ही विभागांवर समांतर जबाबदारी सोपविली होती़ प्रारंभीच्या काही काळात या विभागांनी काम केले़ त्यानंतर मात्र महसूलसह जिल्हा परिषद विभागाने या मोहिमेकडे साफ दूर्लक्ष केल्याने पोलिसांनाच मोहिमेचे ओझे ओढावे लागत आहे़खर्चाची चौकशी होण्याची गरजमहात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त झालेल्या गावांना लाखो रूपयांची पारितोषिके मिळाली आहेत़ ही पारितोषिके कोणत्या कामावर खर्च करावीत याचे काही नियम शासनाने घालून दिले आहेत़ मात्र, अनेक गावातील समित्यांसह ग्रामपंचायतींनी राजकारण करीत हा निधी इतरत्र खर्च केल्याचा आरोप होत आला आहे़ त्यामुळे या निधी खर्चाची चौकशी होण्याची गरज आहे़बेंबळी ठाण्याची आघाडीउस्मानाबाद तालुक्यातील चारही पोलिस ठाण्यांतर्गत मोहीम यशस्वी करण्यात बेंबळी पोलिसांनी आघाडी घेतली आहे़ ठाण्यांतर्गत असलेल्या ४७ पैकी तब्बल ३५ गावे तंटामुक्त झाली आहेत़ यात पहिल्यावर्षी एक, तिसऱ्या वर्षी सहा, चौथ्या वर्षी ११, पाचव्या वर्षी पाच तर सहाव्या वर्षी दोन गावे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून तंटामुक्त केली आहेत़