शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

बाजारचौकी परिसरात अतिक्रमणांवर हातोडा

By admin | Updated: June 24, 2014 00:21 IST

जालना : जुना जालन्यातील लतीफशहा बाजार (बाजार चौकी) भागातील भाजीमंडईतील अतिक्रमणे सोमवारी नगरपालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हटविले.

जालना : जुना जालन्यातील लतीफशहा बाजार (बाजार चौकी) भागातील भाजीमंडईतील अतिक्रमणे सोमवारी नगरपालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हटविले. एकाच दिवसात सुमारे दीडशे दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले असून मंगळवारी गांधीचमनपर्यंतचे अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पोलिस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह यांनी सुरू केली.पहिल्याच दिवशी वीर सावरकर चौक पुतळा परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी नूतन वसाहत भागातील अतिक्रमणे हटविली.रविवारी सुटीमुळे ही मोहीम राबविण्यात आली नाही. मात्र आज सोमवारी सायंकाळी ५ वाजता जुना जालन्यातील सर्वात जुना बाजार ओळखल्या जाणाऱ्या बाजार चौकी परिसरातील अतिक्रमणे हटविण्यास पालिका कर्मचारी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रारंभ केला. दोन्ही बाजूंची सुमारे दीडशे अतिक्रमणे हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला. या भागात अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे सुरूवातीला नागरिकांना काय प्रकार सुरू आहे, हे लक्षात आले नाही. विक्रेत्यांनाही कळले नाही. मात्र अतिक्रमणे हटविण्यास पालिका कर्मचारी व पोलिसांचे पथक असल्याचे कळताच अतिक्रमणे केलेल्या काही विक्रेत्यांनीही आपली अतिक्रमणे स्वत:हून काढण्यास सुरूवात केली. हा रस्ता अत्यंत अरूंद आहे. विक्रेत्यांच्या दुकानासमोर किरकोळ भाजीपाला विक्रेते खाली रस्त्यावरच भाजी विक्रीसाठी बसतात. त्यामुळे या भागातून दुचाकीधारकांनाही ये-जा करण्यास अडचण होते. शिवाय मालवाहतूक करणाऱ्या तीनचाकी वाहनांची या भागातून ये-जा सुरू असते. अशावेळी भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना विशेषत: महिलांना त्रास होतो. त्यामुळे या बाजारातील अतिक्रमण हटविणे महत्वाचे होते. या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)अनेक दिवसांपासून थाटलेली होती अतिक्रमणेबाजार चौकी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अतिक्रमणे आहेत. मात्र त्याकडे प्रशासकीय यंत्रणेकडून सातत्याने दुर्लक्ष होत आलेले आहे. एक-दोन वेळा ही अतिक्रमणे हटविण्यात आली होती. मात्र तेथे पुन्हा अतिक्रमणे थाटण्यात आली. नगरपालिकेने यापूर्वी सदर भागातील अतिक्रमणे हटविण्याचे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्ष कारवाई केव्हा होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. या पार्श्वभूमीवर पालिका कर्मचारी व वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. महिला वर्गातून कारवाईबद्दल समाधानजुना जालन्यातील सर्वात जुनी भाजीमंडई म्हणून बाजारचौकी परिसराची ओळख आहे. मात्र अनेक दिवसांपासून या भागात रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे येथे सतत रहदारी ठप्प होते. या अतिक्रमणांचा त्रास रहदारीला तर होतोच, परंतु बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या महिलांनाही होतो. त्यामुळे या मोहिमेचे महिला वर्गातून स्वागत होत आहे.