शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा टक्काच पाणीसाठा !

By admin | Updated: June 18, 2016 01:00 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. ७ जूननंतर पाऊस पडेल या भाबड्या आशेवर शेतकरी आहेत; मात्र आता तर पिण्याचे पाणीदेखील जिल्ह्यातील

व्यंकटेश वैष्णव , बीडजिल्ह्यातील धरणे कोरडीठाक पडली आहेत. ७ जूननंतर पाऊस पडेल या भाबड्या आशेवर शेतकरी आहेत; मात्र आता तर पिण्याचे पाणीदेखील जिल्ह्यातील प्रकल्पात शिल्लक नाही. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार केवळ ०.५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यात २ मोठ्या प्रकल्पांसह एकूण १४२ सिंचन प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांमध्ये माजलगाव बॅक वॉटर व मांजरा प्रकल्पाचा समावेश आहे. यातील माजलगाव प्रकल्पात ४० द.ल.घ.मी. पाणी साठा शिल्लक आहे. याच पाण्यावर बीड शहरातील पाणीपुरवठ्याची मदार असून, हे पाणी जूनअखेरपर्यंतच पुरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मांजरा प्रकल्पात पाण्याचा टिपूसही शिल्लक नाही. या ठिकाणी काही सामाजिक संस्था व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात १० मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये ६.३७ द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे, तर लघु प्रकल्प १११ आहेत. यामध्ये परळी विभागात असलेल्या एकूण प्रकल्पात १.६ द.ल.घ.मी. पाणी आहे. हे पाणीही उपयुक्त साठ्यापेक्षा कमी असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. ७ जूननंतर पाऊस पडेल व सिंचन प्रकल्पांत थोडेफार पाणी येईल अशी अपेक्षा होती; मात्र पाऊस लांबणीवर पडत असल्याने पिण्याच्या पाण्याचे वांधे झाले आहेत.प्रशासनाकडे टंचाई काळातील आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या तरी उपाययोजना असल्याचे पाहावयास मिळत नाही. यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचे अधिकच दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची शक्यता आहे.धारूर व केज शहराच्या पिण्याच्या पाण्याची मदार असलेल्या कुंडलिका धरणात केवळ १७ दलघमी पाणी शिल्लक असून यापैकी ८ दलघमी पाणीच पिण्यासाठी उचलता येऊ शकते. केज व धारूर शहराला सध्या कुंडलिका धरणावरून टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.अंबाजोगाई शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे काळवटी धरण कोरडेठाक पडले आहे. अधिग्रहीत केलेल्या काही उदभवावरच अंबाजोगाईची पिण्याच्या पाण्याची मदार आहे.