शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा छापा पडूनही गुटखा विक्री सुरूच

By admin | Updated: June 9, 2014 01:13 IST

वसमत: येथील गढी मोहल्ला भागात गुटखाच्याच्या गोदामावर छापा मारून पोलिसांनी पाच लाखांचा गुटखा जप्त केला. मात्र गुटख्याचा व्यवसाय पुन्हा पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याचे चित्र आहे.

वसमत: येथील गढी मोहल्ला भागात गुटखाच्याच्या गोदामावर छापा मारून पोलिसांनी पाच लाखांचा गुटखा जप्त केला. मात्र गुटख्याचा व्यवसाय पुन्हा पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याचे चित्र आहे. गुटख्याच्या व्यवसायातील मुख्य सुत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्याने तो पुन्हा जोमाने गुटखाविक्री करत असल्याचे चित्र आहे. वसमत शहरात पूर्णा येथील कुख्यात गुटखा व्यावसायिकाने गुटखा साठवणूक व वितरण केंद्र सुरू केले. या गोदामावर रेल्वेमार्गे येणारा गुटखा साठवून तो नांदेड- हिंगोली- परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाठवला जात असतो. या व्यवसायासाठी पूर्णा व परभणी जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या युवकांच्या टोळ्याही तैैनात करण्यात आल्या आहेत. गढी मोहल्ला भागात रात्री उशिरा गुटखा उतरतो. दररोज हा प्रकार घडतो; परंतु आजवर वसमत पोलिसांनी या वाहनांची कधी तपासणी करण्याची हिम्मत मात्र दाखवली नाही, हे विशेष. या दुर्लक्षामुळेच वसमत गुटखा विक्रीचे व साठवणुकीचे सर्वांत मोठे केंद्र होवून बसले आहे. गुटखा बंदी झाल्यापासून वसमतमध्ये गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. जवळपास ५० ते ६० फेरीवाले शहरातील मुख्य रस्त्याने फिरून प्रत्येक पानपट्टी, हॉटेल, दुकानांवर गुटखा पोहचवत असतात. शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेले जर्दा विक्री केंद्राच्या माध्यमातूनही गुटख्याची राजरोस विक्री होत आहे. जर्दा विक्री केंद्राच्या मिनी टेम्पोंच्या माध्यमातूनही ग्रामीण भागात गुटखा जात आहे. मात्र आजवर कधीच पोलिसांच्या तपासणीत हा गुटखा सापडला नाही. पोलिसांचे दुर्लक्ष गुटख्याच्या व्यवसायाला बळ देत असल्याचा आरोप सर्वच जण करीत आहेत. गुटखा विक्रेते गुटख्याच्या विरोधात छापा पडणार नाही, अशी व्यवस्था केल्याची ग्वाही देत असतात. गेली वर्षभर तरी हे सत्य ठरत होते. दोन दिवसांपूर्वी हिंगोलीच्या एलसीबी पथकाने मात्र छापा मारून मोठा साठा जप्त केला. या कारवाईत चार जणांना पोलिसांनी अटकही केली होती. या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली. उर्वरित दोन आरोपी अद्याप फरार आहेत. यात आरोपी शेख चाँद व शेख सिराज (दोघे रा.पूर्णा )हे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पूर्णा येथील गुटखा विक्रीचा व्यवसाय करणारेच वसमत येथे गुटखा विक्रीसाठी तळ ठोकून असल्याचेच यावरून दिसत आहे.वसमत पोलिस या दोघांना अटक करून त्यांच्याकडून गुटखाविक्री व्यवसायातील साखळी व या व्यवसायास पाठबळ देणारांची नावे निष्पन्न करतात की नाही? हे पाहणे रंजक ठरणार आहे. पोलिस हे आरोपी शोधून त्यांना अटक करतात की, आरोपी ‘हजर’ होण्याची वाट पाहतात, यावरच गुटखा व्यवसायाच्या समुळ उच्चाटनाची दिशा ठरणार आहे. (वार्ताहर)