पितृपक्षात चक्की महागली

By Admin | Updated: September 21, 2014 00:42 IST2014-09-20T23:53:56+5:302014-09-21T00:42:54+5:30

वडोदबाजार : एरव्ही सहजरीत्या मिळणारी चक्की यंदा दिसेनाशी झाली आहे. पितृपक्षात चक्कीच्या भाजीला विशेष महत्त्व असल्याने बाजारात चक्कीचे दर महागले.

Growth Growth in Father's House | पितृपक्षात चक्की महागली

पितृपक्षात चक्की महागली

वडोदबाजार : एरव्ही सहजरीत्या मिळणारी चक्की यंदा दिसेनाशी झाली आहे. पितृपक्षात चक्कीच्या भाजीला विशेष महत्त्व असल्याने बाजारात चक्कीचे दर महागले आहेत. त्यामुळे चक्कीची भाजी यंदाच्या पित्रातून बहुतांश ठिकाणी लुप्त झाली आहे.
भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पित्रपंधरवडा सुरू झाला असून, येणाऱ्या अमावास्येला संपत आहे. या १५ दिवसांत पूर्वजांचे स्मरण पित्र स्वरूपात केले जाते. संपूर्ण पंधरवडा घरोघर पित्रांचे आयोजन सुरू आहे. या दिवशी विधिवत पूजा करून आपल्या पूर्वजांच्या (वडीलधाऱ्या मंडळीचा) पित्र स्वरूपात दरवर्षी श्राद्ध घातले जाते. दुपारी १२ वाजेनंतर घराच्या छतावर नैवेद्य ठेवला जातो. कावळा जोपर्यंत नैवेद्याचा घास घेत नाही तोपर्यंत तेथेच थांबून कावळा घास घेण्याची वाट पाहतात. कावळ्याच्या रूपाने येऊन आपले पूर्वज पितृपक्षात जेवतात असे समजून कावळ्याने घास घेतल्यानंतर इतर मंडळींचा जेवणाचा कार्यक्रम होतो. पित्राच्या जेवणात कढी (दह्याची), पातोड्या व चक्कीची भाजी हमखास असतेच.

Web Title: Growth Growth in Father's House