शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
4
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
5
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
6
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
7
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
8
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
9
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
10
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
11
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
12
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
13
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
14
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
15
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
16
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
17
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
18
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
19
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
20
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
Daily Top 2Weekly Top 5

शेततळे निर्मितीच्या चळवळीला जिल्ह्यात गती

By admin | Updated: December 23, 2015 23:37 IST

परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेततळे निर्माण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली

परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेततळे निर्माण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून, आगामी एक वर्षांत ४ हजार शेततळे उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली़ परभणी जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळाची स्थिती आहे़ पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाई तीव्र होत चालली आहे़ तसेच सिंचनाचे प्रश्नही निर्माण होत आहेत़ यावर मात करण्यासाठी शेततळे निर्माण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे़ जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे निर्माण केले जाणार आहेत़ प्रत्येक गावामध्ये किमान पाच शेततळे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यात २५० कृषी सहाय्यक असून, प्रत्येक कृषी सहाय्यकाला एक गाव दत्तक दिले आहे़ कृषी सहाय्यकाने दत्तक घेतलेल्या गावात पाचपेक्षा अधिक शेततळे आणि इतर गावांमध्ये किमान पाच शेततळे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ या मोहिमेला शेतकऱ्यांचाही आता चांगला प्रतिसाद मिळत आहे़ आतापर्यंत २५० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, ७८ शेततळ्यांचे काम सध्या सुरू आहे़ एकंदर शेततळ्यांच्या मोहिमेसाठी महसूल, कृषी, पंचायत समिती आणि नरेगा आदी विभागातील अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत़