डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By Admin | Updated: December 7, 2015 01:05 IST2015-12-07T01:04:24+5:302015-12-07T01:05:54+5:30

पानगाव : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पानगाव येथील अस्थी अभिवादनासाठी रविवारी जनसागर उसळला़

Greetings to Dr. Babasaheb Ambedkar | डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


पानगाव : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पानगाव येथील अस्थी अभिवादनासाठी रविवारी जनसागर उसळला़ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पानगाव येथील चैत्यस्मारक परिसरात हजारो अनुयायांची गर्दी होती़ यावेळी विविध सामाजिक संघटनांसह राजकीय नेत्यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले़
मुंबई, नागपूरनंतर लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी गेल्या ५९ वर्षांपासून आंबेडकर नगरात जतन करुन ठेवल्या आहेत़ या अस्थी अभिवादनाला जिल्हाभरासह शेजारील बीड जिल्ह्यातून हजारो अनुयायी पानगावात दोन दिवसांपासून दाखल होतात़ रविवारी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या चैत्यस्मारकाच्या नियोजीत स्थळी हजारो महिला, पुरुष आणि अबाल वृद्धांनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती़ यावेळी सामूहिक धम्मवंदना झाली़ चैत्यस्मारकाच्या नियोजित स्थळी माजी राज्यमंत्री आ़अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार अ‍ॅड़ त्र्यंबक भिसे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, सभापती वेणुताई गायकवाड, सर्जेराव मोरे, प्रा़बी़ व्ही़ मोतीपवळे, पंचायत समिती सभापती प्रदीप राठोड, विक्रम हिप्परकर, कृउबाचे सभापती चंद्रचुड चव्हाण, जि़प़ सदस्य ललिता कांबळे आदींनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले़
रविवारी दुपारी चैत्यस्मारक स्थळी भन्ते कश्यप, भन्ते धम्मकिर्ती, भन्ते रोहण, भन्ते धम्मविरो, भन्ते धम्मसार आदींनी उपस्थितांना धम्मदेसना दिली़ सायंकाळी ४ वाजता जी़ एस़ कांबळे, डी़ एस़ नरसिंगे, के़ ई़ हरिदास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ अभिवादन सभास्थळी व्हटी येथील उपासक-उपासिकांनी दिक्षाभूमी रॅली काढली होती़ थेरगाव येथील ज्ञानज्योत रॅली पानगावात दाखल झाली़ यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना दिली़ हजारो अनुयायांनी रांगेत बाबासाहेबांना अभिवादन केले़

Web Title: Greetings to Dr. Babasaheb Ambedkar