शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकास घेराव

By admin | Updated: August 17, 2014 00:18 IST

ग्रामसेवकास गावातील महिला व पुरूषांनी ग्रा.पं. कार्यालयात दोन तास ठेऊन घेराव घातला होता.

शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथे १५ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेदरम्यान ग्रामसेवकाने चुकीच्या पध्दतीने मोजणी केल्यामुळे गावात दोन गटात तणाव निर्माण झाला. यावेळी ग्रामसेवकास गावातील महिला व पुरूषांनी ग्रा.पं. कार्यालयात दोन तास ठेऊन घेराव घातला होता. पोलिसांच्या मध्यस्थीने हा तणाव निवळला.सारंगवाडी येथील ग्रा.पं. कार्यालयात शुक्रवारी सकाळी ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेतून तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी सारंगवाडी व गवलेवाडी येथील महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी लिंबाजी कुरूडे, शामराव कुरूडे यांचे नाव सुचविण्यात आले. दोघांमध्ये एकमत होत नसल्यामुळे हात उंचावून निवडणूक घेण्यात आली. यामध्ये लिंबाजी कुरूडे यांना ३७५ मते पडली तर शामराव कुरूडे यांना २८८ मते पडली; परंतु मतमोजणी करत असताना ग्रामसेवकांनी शामराव कुरूडे यांना जास्त मतांची मोजणी केल्यामुळे शामराव कुरूडे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके फोडले व नंतर ग्रामसेवकाने लिंबाजी कुरूडे यांना जास्त मते मिळाल्याचे घोषीत केल्यामुळे तेथील महिलांनी ग्रामसेवक विश्वनाथ बिच्चेवार यांना घेराव घालून डांबून ठेवले. यावेळी गावात तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी जमावाला शांत करुन परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. (वार्ताहर)