शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीटिंग कार्डपेक्षा व्हॉटस् अ‍ॅपवर शुभेच्छांचा पाऊस

By admin | Updated: December 28, 2014 01:15 IST

सोमनाथ खताळ , बीड ‘नाती जपली की सगळं काही जमतं, हळूहळू का होईना कोणी आपलसं बनतं ओळख नसली तरी साथ देऊन जातं,

सोमनाथ खताळ , बीड‘नाती जपली की सगळं काही जमतं,हळूहळू का होईनाकोणी आपलसं बनतंओळख नसली तरी साथ देऊन जातं,मैत्रीचं नातं आयुष्यातखूप काही शिकवून जातं..’‘हॅपी न्यू ईअर इन अ‍ॅडव्हान्स..!’ या सारखे एक से बढकर एक मेसेज आता प्रत्येकाच्या मोबाईलवर धडकताना दिसत आहेत. एकूणच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात प्रत्येकजन व्यस्त झाला आहे.नवीन वर्षाच्या आगमनाला आता अवघे चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नवीन वर्ष म्हटलं की, शुभेच्छा द्यायच्या.. संकल्प करायचा... केलेला संकल्प पाळायचाच.. हा निर्धार स्वत:शीच करायचा. असे अनेक प्रकार सध्या तरूणाईसह जेष्ठ नागरीक करताना दिसून येत आहे. अवघे काही दिवस शिल्लक बाकी असल्याने आपणच आपल्या मित्राला, नातेवाईकाला आगोदर कशाप्रकारे शुभेच्छा अ‍ॅडव्हान्समध्ये देवू यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे.खर्चाला फाटा देण्याचा फंडा३१ डिसेंंबर आणि १ जानेवारी या दोन दिवसात मोबाईलवरून मेसेज करणे महागात पडते. त्यामुळे या खर्चाला फाटा देत तरूणाईने आतापासूनच शुभेच्छा द्यायला सुरूवात केली आहे.‘बॉस’कडे रजेचे अर्जनवीन वर्षाचे स्वागत आनंदात करता यावे, त्या दिवशी ‘एन्जॉय’ खूूप करायचा, यासाठी सुट्टी तर लागणारच.. म्हणून अनेकांनी आतापासूनच बॉसच्या टेबलवर रजेचे अर्ज ठेवले आहेत. परवानगी मिळावी यासाठी विनवणी करीत आहेत.४थर्टी फर्स्ट ची तयारी जोरात चालू आहे. प्रत्येकाने नियोजन केले आहे. अनेकांनी तर ‘त्या’ दिवसाचे आतापासूनच मॅनेजमेंट केले आहे. नवनवीन फंडे अवलंबिले जात आहेत. वेळ कमी असल्यामुळे स्थळ व स्वरूप निश्चित करण्यावर भर आहे़४पूर्वी ग्रीटींग कार्डद्वारे शुभेच्छा दिल्या जायच्या. मात्र आता काळ बदलला आहे. स्पर्धेच्या युगात लवकरात लवकर शुभेच्छा पोहोचतील यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे तरूणाईने ग्रीटींग कार्डला फाटा देत सोशल मीडियावरून शुभेच्छा देण्यास पसंती दिली जात आहे. मात्र ग्रीटींग कार्डद्वारे दिलेल्या शुभेच्छांचा आनंदच वेगळा असतो, असे अनेक जेष्ठ व्यक्तींनी सांगितले. ५ ते ५०० रूपयांपर्यंत किंमतीचे कार्ड बाजारात विक्रीसाठी आले आहेत.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्ष सुख, समृद्धीचे जावो... यासारख्या विविध पोस्ट मागील तीन दिवसांपसून फेसबुकवर ‘अपलोड’ केल्या जात आहेत. याला ‘लाईक’ आणि ‘कमेंट्स’चा ढिगारा जमत आहे.