बाहेरगावी गेले अन् स्वाईन फ्लू घेऊन आले !

By Admin | Updated: March 2, 2015 00:53 IST2015-03-02T00:34:37+5:302015-03-02T00:53:52+5:30

शिरीष शिंदे बीड स्वाईन फ्लू आजार मुळात बाहेर देशातील आहे. त्या ठिकाणच्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने हा मुंबई-पुण्यात पोहोचला. मोठ्या शहरांमध्ये जाऊन

Gone outside the swine flu! | बाहेरगावी गेले अन् स्वाईन फ्लू घेऊन आले !

बाहेरगावी गेले अन् स्वाईन फ्लू घेऊन आले !


शिरीष शिंदे  बीड
स्वाईन फ्लू आजार मुळात बाहेर देशातील आहे. त्या ठिकाणच्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने हा मुंबई-पुण्यात पोहोचला. मोठ्या शहरांमध्ये जाऊन आलेल्या नागरिकांनाच याची लागण होत असून ते उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. आतापर्यंत १३ स्वाईन फ्लू बाधित रुग्णांपैकी सहा ते सात व्यक्तींनी बाहेरगावचा दौरा केला होता, असे समोर आले आहे.
जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लू रुग्णांसाठी पंधरा ते वीस दिवसांपूर्वी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला होता. त्यावेळी पहिला स्वाईन फ्लू संशयित रुग्ण झाला होता. तो बाहेर जिल्ह्यात जाऊन आला होता. त्यानंतर पाच ते सहा दिवसांच्या कालावधीत शहंशाहनगर मधील मुलांनी कुटुंंबिय पुणे येथे कामानिमित्त गेले होते. या कुटुंबातील तिघांना फ्लूची लागण झाली असल्याचे ‘नॅशनल इन्सिट्यूट आॅफ व्हायरालॉजी’ (एनआयव्ही) लॅबच्या रिर्पोटमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
चार ठिकाणीच औषधी उपलब्ध
जिल्हा रूग्णालयाकडे स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक गोळ्या व औषधी आहेत. मात्र, आता जिल्हा रूग्णालयाबाहेरूनही रूग्णांना स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक औषधी खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी चार मेडिकल स्टोअर्सची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त रूपेश व्हटकर यांनी दिली. सुभाष रोड येथील दोन, जालना रोडवरील एक तसेच अंबाजोगाई येथील एका मेडिकल स्टोअर्स मध्ये ही औषधी उपलब्ध आहेत.
नगर परिषदमध्ये बैठक
स्वाईन फ्लूच्या जनजागृतीच्या मोहिमेसाठी शनिवारी नगरपरिषदेत बैठक पार पडली. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राम देशपांडे यांनी स्वाईन फ्लूबाबत काय काळजी घ्यावी? यासंदर्भात मार्गदर्शन केले. गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांची उपस्थिती होती. वैयक्तिक व परिसर स्वच्छता ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

Web Title: Gone outside the swine flu!