शहरं
Join us  
Trending Stories
1
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
2
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
3
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
4
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
5
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
6
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
7
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
8
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
9
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
10
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
11
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
12
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
19
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
20
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

महसूलदिनी दहा जणांचा गौरव

By admin | Updated: August 2, 2014 01:43 IST

हिंगोली : महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

हिंगोली : महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम तर आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, नूतन जिल्हाधिकारी टी. जी. कासार, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र परळीकर, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष, अनुराधा ढालकरी, पुरवठा अधिकारी लतिफ पठाण आदींची उपस्थिती होती.तहसीलदार अरविंद नर्सीकर, नायब तहसीलदार सारंग चव्हाण, लिपिक आय. जी. शेट्टे, अव्वल कारकून बी. जे. कारगुडे, मंडळ अधिकारी पी. टी. पतंगे, स्टेनो जी. डी. वानखेडे, तलाठी ए. पी. काकडे, चालक ए. सी. वाघमारे, शिपाई दिलीप भुक्तर व कोतवाल लक्ष्मण पातळे यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला. तर प्राधिनिधीक स्वरुपात कूळ कायद्यातील सातबारा सीताराम दीपके व सुदाम नरवाडे या शेतकऱ्यांना प्रदान केली. सूत्रसंचालन तहसीलदार विद्याचरण कडवरकर तर नायब तहसीलदार राजेश लांडगे यांनी आभार मानले. (जिल्हा प्रतिनिधी)सामान्य नागरिकांना चांगली सेवा द्या- जिल्हाधिकारी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महसूलच्या कामाव्यतिरिक्त इतर अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. सदरील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करावे व सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून अधिक चांगली सेवा द्यावी.महसूल विभागातील तलाठी हा एक महत्वाचा घटक असून, तलाठ्यांनी आपल्या कामाचा वर्षभराचा आराखडा तयार करावा. तसेच शासनाच्या तलाठी रेकॉर्डचे संगणकीकरणाच्या कामात चांगल्या पद्धतीने सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची कामे व्यवस्थित झाल्यास प्रशानावरील ताण कमी होत असतो. त्यामुळे सर्वांनी चांगले काम केल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आमचीही सहकार्याचीच भूमिका असते, असे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सांगितले. नूतन जिल्हाधिकारी टी.जी. कासार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले, आपल्या कार्यालयात आलेला प्रत्येक माणूस येथून जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असले पाहिजे. याकरिता प्रत्येकामध्ये संवेदनशीलता, कार्यतत्परता व समन्वय असणे आवश्यक आहे.