शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

"युद्ध थांबावं, आम्हाला सुखरूप घरी जाता यावं"; छ. संभाजीनगरमध्ये ६५ परदेशी पाहुण्यांची प्राथना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:28 IST

अजिंठा-वेरूळच्या शांततेत परदेशी पाहुण्यांना युद्धाची चिंता; १३ देशांच्या प्रतिनिधींची सुरक्षित परतीसाठी बुद्ध चरणी प्रार्थना

छत्रपती संभाजीनगर : इतिहास, कला आणि संस्कृतीच्या शांत वातावरणात फिरत असतानाही परदेशी पाहुण्यांच्या मनात मात्र युद्धाची चिंता पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरच्यापर्यटनस्थळांचा आनंद घेताना त्यांच्या नजरा वारंवार मोबाईलवर अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या बातम्यांकडे वळत आहेत. अजिंठा-वेरूळच्या शांत लेणीत इतिहासाचे सौंदर्य अनुभवताना परदेशी प्रतिनिधींच्या मनात एकच इच्छा उमटत आहे, ती म्हणजे जगात शांतता नांदावी अन् घरी परतण्याचा प्रवास सुरक्षित व्हावा.

वेरुळ-अजिंठा ही जागतिक वारस्थास्थळे असलेल्या पर्यटननगरीत ‘फॅमल रायझिंग टूर’साठी आलेल्या काही प्रतिनिधींनीही पर्यटनाचा आनंद घेत असतानाच युद्ध लवकर थांबावे आणि आपला परतीचा प्रवास सुरक्षित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ब्राझील, चीन, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, रशिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेदरलँड्स, युनायटेड किंगडम, अमेरिका आणि व्हिएतनाम या १३ देशांतील प्रतिनिधींनी अजिंठा, वेरूळ, देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा या स्थळांना भेटी दिल्या. दिवसभर ऐतिहासिक ठिकाणे पाहताना ते उत्साहाने फोटो, व्हिडिओ आणि अनुभव शेअर करीत असले तरी मोबाईलवर युद्धाच्या घडामोडींच्या बातम्यांवर त्यांची नजर सतत असल्याचे दिसून आले. युद्धाच्या बातम्यांमुळे परतीच्या प्रवासाची काहीशी चिंता व्यक्त केली. हे प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरहून नाशिकला रवाना होतील. प्रतिनिधींचा आणखी एक गट २ व ३ मार्चला शहरात येणार आहे.

पर्यटन आनंदासाठी, भीतीसाठी नाही
काही प्रतिनिधींनी अनौपचारिक संवादात सांगितले की, भारताचा प्रवास अतिशय सुंदर आणि शांततेचा अनुभव देणारा आहे. आम्ही येथे पर्यटनाचा आनंद घेत आहोत; मात्र जगात संघर्ष सुरू असताना मन पूर्णपणे मोकळे होत नाही. युद्ध थांबावे आणि सर्व देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, हीच अपेक्षा आहे. अनेक प्रतिनिधींनी इतिहासातील युद्धांच्या कथा पाहिल्यानंतर आजच्या जगाने शांततेचे महत्त्व अधिक समजून घ्यायला हवे, असे मत व्यक्त केले. अजिंठा लेणीतील बौद्ध संस्कृतीचा शांततेचा संदेश आणि वर्तमानातील संघर्ष यातील विरोधाभास त्यांनी अधोरेखित केला.

थोडी चिंता
येथील पर्यटनस्थळांना भेट दिली. अतिशय प्रेरणादायी आणि सुंदर अनुभव आले. युद्धाच्या स्थितीमुळे थोडी चिंता आहेच. घरी जाण्याचा प्रवास सुखकर होईल, अशी आशा आहे.
- पॅट्रिशिया हावेमन, नेदरलँड्स

English
हिंदी सारांश
Web Title : End the war, ensure safe return: Foreign tourists' plea.

Web Summary : Foreign tourists in Chhatrapati Sambhajinagar, enjoying historical sites, express concern over global conflicts. They hope for peace and a safe journey home amidst war news, highlighting the contrast between historical peace messages and current unrest.
टॅग्स :United Kingdomयुनायटेड किंग्डमDoulatabad Fortदौलताबाद किल्लाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAjantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटन