शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2015 00:40 IST

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी शेंद्रा औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक करावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत.

औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी शेंद्रा औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक करावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील एकमेव वाळूज औद्योगिक वसाहत रोल मॉडेल बनवावी. येथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी औरंगाबादेतील उद्योजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.२९ जून ते ३ जुलैपर्यंत मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत औरंगाबादेतील उद्योजक मुकुंद भोगले, एन. श्रीराम, उमेश दाशरथी, भूषण जोशी, संजीव तांबोळकर, सुनील किर्दक यांची उपस्थिती होती. महाराष्ट्रात जास्तीत जास्त विदेशी गुंतवणूक यावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी विविध बैठकांमध्ये औद्योगिक महत्त्व विशद केले. सीआयआय या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष एन. श्रीराम यांनी आज एका पत्रकार परिषदेत दौऱ्यांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे राज्यात ३० ते ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. डीएमआयसी प्रकल्पांतर्गत विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी वाळूजची औद्योगिक नगरी रोल मॉडेल म्हणून तयार करणे गरजेचे असल्याचे स्थानिक उद्योजकांनी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना सांगितले.वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. चांगले दर्जेदार रस्ते तयार व्हावेत. या भागात ग्रीन बेल्टसाठी जागा तर आहे; पण झाडे कुठेच नाहीत. विविध कंपन्यांसमोर झालेली अतिक्रमणे दूर करावीत. औरंगाबाद ते मुंबई या प्रवासासाठी आठ पदरी रस्ता तयार करावा. जेणे करून नागरिकांना चार तासांतच मुंबई गाठता येईल.नागपूर व्हाया औरंगाबाद- मुंबई असा आठ पदरी रस्ता असायला हवा, आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. पत्रकार परिषदेस सुनील किर्दक, अमोल मोहिते, बालाजी शिंदे, संदीप नागोरी आदींची उपस्थिती होती.