शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्या

By admin | Updated: June 24, 2014 00:42 IST

परभणी: गंगाखेड तालुक्यातील उखळी खु. येथील ग्राहक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेची रक्कम द्यावी, असा आदेश राज्य ग्राहक आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठवाडा ग्रामीण बँकेला दिला आहे.

परभणी: गंगाखेड तालुक्यातील उखळी खु. येथील ग्राहक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेची रक्कम द्यावी, असा आदेश राज्य ग्राहक आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठवाडा ग्रामीण बँकेला दिला आहे.
अ‍ॅड. प्रवीण कालानी यांनी या प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार उखळी येथील रामराव फड व इतर १८ शेतकऱ्यांनी परभणी येथे जिल्हा ग्राहक मंचात मराठवाडा ग्रामीण बँक आणि अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लि. मुंबई यांच्याविरुद्ध अ‍ॅड. निलिमा कोकड यांच्यामार्फत तक्रार दाखल करुन राष्ट्रीय कृषी विमा योजनेचे पैसे देण्याची मागणी केली होती. या तक्रारीचा निर्णय होऊन जिल्हा ग्राहक मंचाने २७ जून २००८ व ७ जानेवारी २००९ च्या आदेशान्वये मराठवाडा ग्रामीण बँकेस विमा योजनेची रक्कम देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध मराठवाडा ग्रामीण बँकेने राज्य ग्राहक आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते. हे अपील सुनावणीस निघाले असता सर्व शेतकऱ्यांची बाजू अ‍ॅड. प्रवीण कालानी यांनी मांडली.
राष्ट्रीय कृषी विमा योजना घेताना जे आवेदनपत्र भरले होते. त्यामध्ये माखणी सर्कल ऐवजी आवलगाव सर्कल हे चुकीने लिहिण्यात आले. सर्व शेतकरी हे बँक कर्मचाऱ्यांवर अवलंबून होते.
आवेदनपत्र भरताना ज्या काही चुका झाल्या त्या योजनेच्या नियमाप्रमाणे मराठवाडा ग्रामीण बँकेमुळे झाल्या असून त्यामुळे विमा योजनेची रक्कम देण्याची जबाबदारी ही मराठवाडा ग्रामीण बँकेची आहे. अ‍ॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया यांनी चुकीच्या लिहिलेल्या सर्कलमुळे विमा योजनेची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास असमर्थता दर्शविली. ही चूक बँकेच्या निष्काळजीपणामुळे झाल्याने मराठवाडा ग्रामीण बँक ही रक्कम देण्यास जबाबदार आहे, असे कालानी यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिली.
ही बाब मान्य करीत न्या. एस. एम. शेंबोळे व ए. बी. गवळी यांच्या खंडपीठाने मराठवाडा ग्रामीण बँकेची सर्व अपिले फेटाळून लावली. या प्रकरणात शेतकऱ्यांतर्फे अ‍ॅड. नंदकिशोर कालानी यांनी युक्तीवाद केला. (प्रतिनिधी)
बँकेचा निष्काळजीपणा केला मान्य
गंगाखेड तालुक्यातील उखळी येथील शेतकऱ्यांच्या विमा योजनेचे अर्ज भरुन घेताना माखणी सर्कलऐवजी आवलगाव सर्कल, असे चुकीने लिहिण्यात आले. त्यामुळे सर्कल चुकीचे असल्याने विमा कंपनीने रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली आहे. या भागातील शेतकरी बँक कर्मचाऱ्यांवरच अवलंबून असल्यामुळे यात बँकेचाच निष्काळजीपणा असल्याचे अ‍ॅड.प्रवीण कालानी यांनी युक्तीवादाद्वारे आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. हा युक्तीवाद आयोगाने मान्य केला.