शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

दूर होईना ‘नीट’ संभ्रम

By admin | Updated: April 14, 2016 01:20 IST

नजीर शेख , औरंगाबाद वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी मे २०१६ मध्ये ‘नीट’ (नॅशनल इलिजिबिलिटी एन्स्ट्रन्स टेस्ट- एनईईटी) परीक्षा होणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले

नजीर शेख , औरंगाबादवैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी मे २०१६ मध्ये ‘नीट’ (नॅशनल इलिजिबिलिटी एन्स्ट्रन्स टेस्ट- एनईईटी) परीक्षा होणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले असले तरी मे २०१७ मध्ये होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेमुळेही राज्यातील विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. वैद्यकीय शिक्षणाचा गेल्या काही वर्षांपासून चालू असलेला खेळखंडोबा येत्या वर्षातही चालू राहणार असल्याचे दिसत आहे. जुलै २०१३ साली ‘नीट’ रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रात २०१४ आणि २०१५ या वर्षी ‘एमएचसीईटी’ घेण्यात आली. यामध्येही २०१५ सालची एमएचसीईटी ही केवळ बारावीच्या विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित होती. आता मे २०१६ मध्ये ‘एमएचसीईटी’ होणार की ‘नीट’, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. राज्याचे उच्च व वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘नीट’ परीक्षा राज्यात २०१७ मध्येच घेण्यात येईल, असे जाहीर केले आहे. मे २०१६ मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी २०१७ मध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे नवाच पेच निर्माण झाला आहे. २०१५ मध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी एमएचसीईटी ही केवळ बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याचे जाहीर केले गेले. त्यामुळे अनेक जणांना केवळ एमएचसीईटी द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनीही अकरावीच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष केले. आता २०१७ मध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अकरावी संपून अनेक कनिष्ठ महाविद्यालयांत बारावीचा निम्मा अभ्यासक्रमही संपला आहे. या विद्यार्थ्यांनीही अकरावीच्या अभ्यासक्रमाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे आता २०१७ मध्ये ‘नीट’ द्यावयाची झाल्यास या विद्यार्थ्यांना आता पुन्हा अकरावीचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे अभ्यासक्रमाचा हा उलटा प्रवास विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये २०१७ मध्येही होऊ घातलेल्या ‘नीट’ला विरोध आहे.