शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे गेवराईकर त्रस्त

By admin | Updated: June 15, 2014 00:56 IST

गेवराई: शहरात पाच ते सहा तास भारनियमन केले जाते. यामुळे उकाड्यासह इतर अनेक संकटांना गेवराईकरांना सामोरे जावे लागत आहे.

गेवराई: शहरात पाच ते सहा तास भारनियमन केले जाते. यामुळे उकाड्यासह इतर अनेक संकटांना गेवराईकरांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा रात्रीच्यावेळी वीज गायब होते. यामुळे नागरिकांना रात्र अंधारात चाचपडत काढावी लागते.पावसाळा सुरू झाला असला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने वातावरणात उष्णता वाढलेली आहे. उष्णतेपासून संरक्षण व्हावे, यासाठी महिला, मुले, वृद्ध व नागरिक विजेवरील उपकरणे पंखा, कूलर, एसी आदी सुरू करून घरामध्ये बसतात. असे असले तरी शहरात दुपारच्या वेळी व सायंकाळीही भारनियमन केले जाते. त्यामुळे विद्युत उपकरणाचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. ही उपकरणे बंद असल्याने नागरिकांना उकाड्यात बसावे लागते. गेवराईत दोन टप्प्यात भारनियमन होत असून याचा फटका व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणावर बसत आहे. कधी-कधी पाच ते सहा तासांपेक्षा अधिक वेळ वीज नसते. यामुळे हॉटेल, रसवंतीगृह, ज्यूस सेंटर, झेरॉक्स सेंटर, कांडण यंत्र आदी छोट्या व्यावसायिकांचे उद्योग बंद पडतात. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे गेवराई शहरातील भारनियमन बंद करण्याची मागणी मनोज जैस्वाल, उमेश मानधने, रामेश्वर पाटेकर, महावीर मडकर आदींनी केली आहे. या संदर्भात महावितरणचे उपअभियंता सारडा म्हणाले की, वरिष्ठांच्या आदेशानुसार भारनियमन करण्यात येत आहे. (वार्ताहर)उकाड्याने जनता मेटाकुटीसगेवराई शहरात पाच ते सहा तास केले जाते भारनियमन.भारनियमनामुळे विद्युत उपकरणे बंद असल्याने नागरिकांना सहन करावा लागतो उकाड्याचा त्रास.भारनियमनाचा छोट्या व्यावसायिकांनाही बसतो फटका.