शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

शहर परिसरात गॅस्ट्रोचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:10 IST

औरंगाबाद : शहर आणि लगतच्या भागांमध्ये गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून, वाळूज परिसरातील मेहंदीपूर गावात गॅस्ट्रोमुळे एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद : शहर आणि लगतच्या भागांमध्ये गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून, वाळूज परिसरातील मेहंदीपूर गावात गॅस्ट्रोमुळे एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घाटी रुग्णालयात सरासरी दररोज गॅस्ट्रोचे ५ ते ६ रुग्ण दाखल होत आहेत. तर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या यापेक्षा अधिक आहे; परंतु या आजाराला नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत आहे. त्यामुळे शहर आणि परिसराचे आरोग्य धोक्यात आले आहे. मेहंदीपूर गावात गॅस्ट्रोची लागण झाल्यामुळे काल एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तर ८ बालकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पावसाळ्याला सुरुवात होत नाही तोच शहरात जलजन्य विकारांनी डोके वर काढले. शहरातील विविध भागांमधील जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागलेली आहे. त्यामुळे अशा ठिकाणाहून पिण्याच्या पाण्यामध्ये दूषित पाणी मिसळल्याने गॅस्ट्रोची लागण होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण गॅस्ट्रोने त्रस्त झाले आहेत. बालकांमध्ये गॅस्ट्रोचे प्रमाण काहीसे अधिक आहे. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसह जलजन्य विकार उद्भवत आहेत. घाटी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये अतिसार, उलट्या, पोटात मुरड येणे यासारख्या तक्रारी असलेले रुग्ण उपचारासाठी येत आहेत. बदललेल्या वातावरणामुळे गॅस्ट्रोच्या साथीचा जोर वाढला आहे. शहरातील विविध भागांमध्ये होणारा दूषित पाण्याचा पुरवठा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने पसरलेली दुर्गंधी आजारांना आमंत्रण देत आहे; परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. याविषयी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहास जगताप म्हणाले, गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत आहेत; परंतु काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही.अन्नपदार्थ झाकून ठेवणे, शिळे अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे. उलट्या, जुलाब असा त्रास झाल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.