शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गणोरे वावरला ‘फिल्मी स्टाईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:49 IST

बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांच्या हत्येत महत्त्वाची भूमिका निभावणारा शिवसेना शाखाप्रमुख किरण गणोरे हा घटनेच्या दुसºया दिवशी अगदी फिल्मी स्टाईल वावरल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांच्या हत्येत महत्त्वाची भूमिका निभावणारा शिवसेना शाखाप्रमुख किरण गणोरे हा घटनेच्या दुसºया दिवशी अगदी फिल्मी स्टाईल वावरल्याचे समोर आले आहे. चित्रपटामध्ये एखादा व्हिलन खून करूनही आपला त्या घटनेशी संबंध नसल्याचे दाखविण्यासाठी ज्या गोष्टी करतो अगदी तशाच गोष्टी गणोरेने केल्याचे समोर आले आहे. जणू या घटनेशी आपला काहीच संबंध नाही, याप्रमाणे तो होळकर यांच्या छत्रपतीनगरातील घरी तसेच त्यांचे शवविच्छेदन सुरू असतानाही घाटीत गेला होता.बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांची हत्या त्यांच्या पत्नी भाग्यश्री होळकर हिनेच सुपारी देऊन घडवून आणल्याचे रविवारी समोर आले. शुक्रवारी रात्री होळकर यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. भाग्यश्री हिने हत्येसाठी सुपारी दिलेल्या रकमेतील अ‍ॅडव्हान्स म्हणून दहा हजार रुपये किरणला मिळाले होते. किरणने यातील एक हजार रुपये तौसिफला दिले आणि नऊ हजार स्वत:कडे ठेवून घेतले होते. काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम किरणमार्फत भाग्यश्री आरोपींना देणार होती. होळकर यांच्या हत्येच्या कटात महत्त्वाची भूमिका बजावणारा किरण याप्रकरणी आपण पकडले जाऊ नये, याची काळजी घेत होता. या खबरदारीचा भाग म्हणून व आपल्यावर संशय येऊ नये म्हणून घटनेच्या रात्री तो स्वत:च्या घरीच झोेपून होता. सामाजिक कार्यकर्त्याप्रमाणे तो घटनेच्या दुसºया दिवशी होळकर यांचे शवविच्छेदन सुरू असताना घाटीत गेला. घाटीतील अभ्यागत समितीचा सदस्य या नात्याने तो तेथील काही लोकांशी बोललाही. दिवसभर फिरल्यानंतर शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे तो घरी झोपला.