शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांना अन्न परवाना आवश्यक

By admin | Updated: September 1, 2016 01:07 IST

शिरीष शिंदे , बीड गणेश उत्सवादरम्यान भाविकांना वाटप होणाऱ्या अन्न पदार्थातून विषबाधेसारखी अप्रिय घटना होऊ नये याची खबरदारी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने

शिरीष शिंदे , बीडगणेश उत्सवादरम्यान भाविकांना वाटप होणाऱ्या अन्न पदार्थातून विषबाधेसारखी अप्रिय घटना होऊ नये याची खबरदारी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न पदार्थासाठीचा परवाना घेणे आवश्यक असल्याचे परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक पोलीस अधीक्षक व धर्मादाय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आले आहे.अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व त्यातील नियमन २०११ नुसार गणेश मंडळांना महाप्रसाद वाटप प्रसंगी घ्यावयाच्या काळजीची सूचना दिल्या गेली आहे. ५ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. तत्पूर्वी गणेश मंडळे धर्मादाय आयुक्त यांच्याकडून परवानगी घेतील. त्यामुळे सदर कार्यालयास अन्न व औषध विभागाने परिपत्रक पाठवून गणेश मंडळांना परवाना घेण्याबाबत सूचित करण्यात येणार आहे. कोणत्याही ठिकाणी अन्नपदार्थ बनविताना त्यासाठीची काळजी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणी करणे बंधनकारक आहे. अनेक गणेश मंडळे भंडारा / महाप्रसादाचे वाटप करतात. त्यामुळे त्यांना अन्न पदार्थ बनविताना घ्यावयाची काळजी सूचित करण्यात आली आहे.वांगी (ता. बीड) येथे महाप्रसादातून विषबाधा झाल्याने ५०० भाविकांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या संदर्भात सूचना दिल्या.अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तीने नाक, कान, डोळे, केस खाजवणे टाळावे, संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने अन्नपदार्थ बनवू नये. अन्नपदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत. शिळा प्रसाद भक्तांना वाटप करू नये. अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करू नये. पिण्याचे पाणी निर्जुंतूक करूनच वापरावे. प्रसाद बनविणाऱ्या व्यक्तीने हातमोजे, अ‍ॅप्रॉन घालावा. त्यांनी वैयक्तिक स्वच्छतेसह सर्व नियमांची अंमलबजावणी करावी. कच्च्या अन्नपदार्थांची खरेदी बिले बाळगावीत. तसेच ते पदार्थ परवानाधारक दुकानामधून खरेदी करावेत.