शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षदिंडीने गांधी चमन दुमदुमले

By admin | Updated: July 26, 2014 00:41 IST

जालना : पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवडीबरोबरच त्यांचे संवर्धन करण्याची जाणीव समाजात निर्माण व्हावी म्हणून लोेकमत संस्काराचे मोती ग्रीन किडस् २०१४ या स्पर्धेंतर्गत

जालना : पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवडीबरोबरच त्यांचे संवर्धन करण्याची जाणीव समाजात निर्माण व्हावी म्हणून लोेकमत संस्काराचे मोती ग्रीन किडस् २०१४ या स्पर्धेंतर्गत शुक्रवारी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करुन तसेच लेझिम व पावली खेळत वृक्ष दिंडी काढली. या दिंडीमुळे गांधी चमन परिसर दणाणून गेला.डबलजीन भागातील किड्स केंब्रिज व अंकुर बालक मंदिरातील विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचा पोषाख परिधान केला होता. तसेच काही विद्यार्थ्यांनी पाना फुलांनी पालखी सजविली. त्या पालखीत रोपटी ठेवण्यात आली होती. स्काऊट गाईडचे विद्यार्थ्यांनी त्यांचा गणवेश परिधान केला होता. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात हिरवेगार रोपटे शोभून दिसत होते.या रोपट्यांनी शहराची शोभा वाढविली होती. विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन तसेच लागवडीसाठी जनजागृतीपर घोषणा दिल्या. फलक झळकविले. किड्स केंब्रिज शाळा ते स्काऊट गाईड मैदानापर्यंत मोठी वृक्ष दिंडी काढण्यात आली. स्काऊट गाईड मैदानावर वृक्षारोपण करुन दिंडीचा समारोप झाला. यावेळी मुख्याध्यापिका अलका गव्हाणे, जिल्हा आयुक्त स्काऊट सुनील पांडे, जिल्हा आयुक्त गाईड विमलताई आगलावे, जिल्हा सचिव श्रीरंग बोंद्रे, सहसचिव गाईड अख्तरजहाँ कुरेशी, पराग खुजे, प्रिया अधाने, छाया खंडागळे, रसिका पोखरकर, श्रद्धा वाघमारे, शबनर सिद्दीक, सुचिता कुलकर्णी, रीना निर्मळ, विशाल नाकोडे, पुणम दायमा, हसमुख सुरवैय्ये, स्वाती शिंदे, पायल कठ्ठर, कविता नरोडे, आशा कदम आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)वृक्ष संवर्धनाचा संकल्प यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनासाठीही प्रचार व प्रसार करु असा संकल्प यावेळी सोडला. प्रत्येक नागरिकाने एक तरी वृक्ष लावावा व त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी काढण्यात आलेल्या दिंडीत करण्यात आले.५०० वृक्षांचे रोपण लोकमत परिवार व किडस् केंब्रिजच्या वतीने स्काऊट गाईड मैदानावर ५०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यात बदाम, निलगिरी, गुलमोहर,चिंंच, आंबा आदी विविध झाडांचा समावेश होता. यावेळी स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.