शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

गणपती पावला! राज्यातील शेतकऱ्यांना ३५०१ कोटींची नुकसान भरपाई, सोमवारपासून खात्यावर

By विकास राऊत | Updated: September 8, 2022 19:40 IST

मराठवाड्यातील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यां ही मदत सोमवारपासून बँक खात्यावर जाणार आहे.

औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्याला खरीप हंगामात यंदा अतिवृष्टी आणि पूराचा फटका बसला. यात जुलैमध्ये ५ लाख ८७ हजार ४६६.४१ तर ऑगस्टमध्ये १ लाख ४० हजार ३३१.४४ असे ७ लाख ३६ हजार १३३.३८ हेक्टर जिरायती व फळबाग क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईसाठी शासनाने गुरुवारी सायंकाळी १ हजार ८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. 

विभागातील १० लाख ९ हजार २७० शेतकऱ्यां ही मदत सोमवारपासून बँक खात्यावर जाणार आहे. राज्यातील सुमारे २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे बाधित क्षेत्र २३ लाख ८१ हजार इतके आहे. मुख्यमंत्र्यांनी ३ हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केल्याने व सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीलाही मोबदला मिळेल, अशी घोषणा केल्याने मराठवाड्याला अनुदान वाटपासाठी १ हजार ५९६ कोटी ९१ लाख ५७ हजार रुपयांचा निधी लागणार आहे, असा प्रस्ताव विभागीय आयुक्तालयाच्या वतीने राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. त्यातुलनेत केवळ अतिवृष्टीची नुकसान भरपाई ची १ हजार ८ कोटीची मदत जाहीर केली आहे. 

एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने मोबदला जाहीर केला आहे. शिवाय २ ऐवजी ३ हेक्टरचा समावेश केला. तसेच सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांनाही मोबदल्याची घोषणा केली. ही मदत गुरुवारी काढलेल्या अध्यदेशात नाही. तसेच गोगलगायच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसान मोबदल्यापोटी काहीही मदत यात नाही.

दोन दिवसात मदत वाटप सुरू होईलदोन दिवसात शेतकऱ्यांना मदत वाटप होईल. तीन टप्प्यात मदत मिळेल, यात महा अतिवृष्टी, अतिवृष्टी आणि गोगलगाय व्हायरलमुळे जे नुकसान झाले, त्याची मदत केली जाईल. शासनाने जे निकष लावून नुकसान भरपाई दिली, विमा कंपन्यानी तातडीने त्याच आधारे भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. - अब्दुल सत्तार, कृषीमंत्री 

मराठवाड्यात किती मदतजालना--३ कोटी ७१ लाख ८४ हजार-- बाधित क्षेत्र-२३११.७९ हेक्टरपरभणी--१कोटी ६० लाख ३४ हजार--बाधित क्षेत्र ११७९ हेक्टर हिंगोली--१५७कोटी४ लाख ५२ हजार--बाधित क्षेत्र १ लाख १३ हजार ६२० हेक्टर नांदेड--७१७ कोटी ८८ लाख ९२ हजार--बाधित क्षेत्र ५ लाख २७ हजार ४९१ हेक्टर लातूर--३७ कोटी ३० लाख ८३ हजार--बाधित क्षेत्र-२७ हजार ४२५.३७ हेक्टरउस्मानाबाद--९०कोटी ७४ लाख ३६ हजार--बाधित क्षेत्र--६६ हजार ७२३.२० हेक्टर एकूण नुकसानग्रस्त क्षेत्र; ७३८७५०.३६ हेक्टर एकूण मदत; १ हजार ८ कोटी ७१ लाख २४ हजार (वाहून गेलेल्या जमिनीसह)

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद