शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदासाठी महिलांचा ठाण्यावर मोर्चा

By admin | Updated: August 21, 2014 23:20 IST

वसमत : तालुक्यातील पळसगावातील अवैध दारुविक्री बंद करून दारुड्यांच्या त्रासातून मुक्त करण्याच्या मागणीसाठी गावातील महिला व ग्रामस्थांनी थेट ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला.

वसमत : तालुक्यातील पळसगावातील अवैध दारुविक्री बंद करून दारुड्यांच्या त्रासातून मुक्त करण्याच्या मागणीसाठी गावातील महिला व ग्रामस्थांनी थेट ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचीही महिलांनी भेट घेवून गाऱ्हाणे मांडले. यावरुन ग्रामीण भागात अवैध दारुने किती कहर केलाय, हे पहावयास मिळते.वसमत तालुक्यात ‘गाव तेथे दारुचे दुकान’ हे समीकरण होवून बसले आहे. वसमतमधून दुचाकीवर दारुचे खोके घेवून प्रत्येक गावा-गावात दारु पार्सलच्या नावाने पोहोचली जाते. राष्ट्रीय महामार्गावरून खुलेआम दारु जात असली तरी पोलिसांच्या नजरेस दुचाकीस्वार का पडत नाहीत, हा प्रश्न कायमच राहतो. डिलिव्हरी मिळत असल्याने गावात दारुअड्डे तयार झाले व दारुड्यांनी धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली आहे. याचवेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आले असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी गावातील दारुमुळे उद्भवलेली परिस्थिती कथन केली. शिष्टमंडळासोबत व्यसनमुक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासराव कातोरे, तंटामुक्तीचे डाखोरे, सरपंच, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांसह महिलांची उपस्थिती होती. गावात दारुच्या नशेपाई गेल्या दोन वर्षात किमान १० तरुणांचे निधन झाल्याची माहिती व्यंकटी पानधोंडे, ज्ञानेश्वर पानधोंडे, गणेश मिरकुटे आदींनी सदर प्रतिनिधीशी बोलताना दिली. आता ग्रामस्थांनी दारु विरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतल्याने अवैध दारूविक्रेते चांगलेच हादरले आहेत.(वार्ताहर)