छत्रपती संभाजीनगर: इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर प्रेमाचे नाटक करून एका ३५ वर्षीय विवाहित महिलेवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी जलसंपदा विभागातील उपअभियंता वैभव विजय पाटील याच्यावर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव सध्या हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात कार्यरत आहे.
कॉफीच्या बहाण्याने बोलावून ब्लॅकमेलिंगतक्रारदार महिला आणि वैभव यांची जुलै २०२५ मध्ये इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. १६ जुलै रोजी कॉफी पिण्याच्या बहाण्याने वैभवने पीडितेला बोलावले आणि आलिशान कारमधून फिरवले. पीडितेच्या आरोपानुसार, त्यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटिंग तिच्या पतीला पाठवण्याची धमकी देऊन त्याने पहिल्यांदा तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले.
चित्रीकरण करून वारंवार अत्याचारआरोपीने अत्याचाराचे चित्रीकरण केले असून ते व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याच धमकीच्या आधारे २५ जुलै ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शहरातील विविध हॉटेल्समध्ये नेऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार करण्यात आले. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसांकडे तक्रार नोंदवली, ज्यावरून वैभव पाटीलवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
Web Summary : A जलसंपदा department engineer, Vaibhav Patil, is accused of raping a married woman after befriending her on Instagram. He allegedly blackmailed her with compromising content, leading to repeated abuse in hotels. A case has been filed against Patil.
Web Summary : इंस्टाग्राम पर दोस्ती के बाद जलसंपदा विभाग के इंजीनियर वैभव पाटिल पर एक विवाहित महिला से बलात्कार का आरोप है। कथित तौर पर उसने ब्लैकमेल कर होटलों में बार-बार शोषण किया। पाटिल के खिलाफ मामला दर्ज।