शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:05 IST

मुख्य सूत्रधार गुजरातनंतर आता छत्रपती संभाजीनगरमधून चालवत होता फसवणुकीचा धंदा

छत्रपती संभाजीनगर: शहरातील चिखलठाणा एमआयडीसी परिसरात पोलिसांच्या विशेष पथकाने मध्यरात्री मोठी कारवाई करत एका बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना फसवणुकीचे कॉल केले जात होते. पोलिसांनी या केंद्रातून ९२ मुले आणि २४ मुलींसह एकूण ११६ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. 'गिफ्ट व्हाऊचर'चे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे बोगस कॉल सेंटर गेल्या एक वर्षापासून अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू होते. इमारतीच्या आतमध्ये पडदे लावून, रात्री साडेसहा वाजल्यापासून सकाळपर्यंत कामाचे स्वरूप असायचे. विशेष म्हणजे, या कॉल सेंटरचे कर्मचारी 'हाय प्रोफाइल' गाड्यांमधून आत येत असत, ज्यामुळे परिसरातील लोकांना संशयही आला नाही. गुजरातमध्ये सुरू असलेले हे रॅकेट तेथील कारवाईनंतर अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर शहरात हलविण्यात आले होते.

११६ जणांना अटकसोमवारी रात्री ११ वाजता दोन डिसीपी, १५ पेक्षा अधिक पीआय, पीएसआयसह १०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करून या इमारतीवर छापा टाकला. मंगळवारी दुपारी पाच वाजेपर्यंत ही कारवाई पूर्ण झाली. पोलिसांनी या केंद्रातून ९२ मुले आणि २४ मुलींसह एकूण ११६ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये बहुतांश तरुण हे ईशान्येकडील मेघालय, नागालँड आणि सिक्कीम राज्यांतील आहेत. सर्व आरोपींची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. सध्या पोलिसांनी सर्व संगणक, सर्व्हर आणि फसवणुकीसाठी वापरलेली कागदपत्रे ताब्यात घेतली असून, या तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US Citizens Duped: Racket Busted in Chhatrapati Sambhajinagar, 116 Detained

Web Summary : A fake international call center defrauding US citizens was busted in Chhatrapati Sambhajinagar. Police arrested 116 people, including 92 men and 24 women. The racket, promising gift vouchers, allegedly swindled millions. The operation, recently moved from Gujarat, was run secretly by Farooq Shah.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर