शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

१० वॅगन घेऊन जलपरीची चौथी फेरी

By admin | Updated: April 16, 2016 00:12 IST

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मिरजेहून रेल्वेने पाणी आणण्यात येत आहे. गेल्या मंगळवारपासून दररोज ५ लाख लिटर्सची एक खेप करण्यात येत असून,

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मिरजेहून रेल्वेने पाणी आणण्यात येत आहे. गेल्या मंगळवारपासून दररोज ५ लाख लिटर्सची एक खेप करण्यात येत असून, शुक्रवारी जलपरीने १० वॅगनची एक खेप केली. आतापर्यंत रेल्वेने २० लाख लिटर्स पाणी आणण्यात आले आहे. मिरजेहून ५० वॅगन पाणी आणण्याचे नियोजन आहे. मात्र पाणी भरणे व उतरविण्याची यंत्रणा आणखी कार्यक्षम नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत दहा वॅगन आणल्या जात आहेत. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता जलपरी दहा वॅगन घेऊन आली. ६.१५ वाजता वॅगनमधील पाणी रेल्वे स्थानकालगत असलेल्या एस.आर. देशमुख यांच्या विहिरीत उतरविण्यात आले. त्यानंतर या विहिरीतून टँकरद्वारे आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी टाकण्यात आले. रात्री १० वाजेपर्यंत पाणी उतरविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर जलपरी मिरजेकडे रवाना झाली. दरम्यान, लातूर दौऱ्यावर असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रेल्वेस्थानकातील पाणी उतरविण्याच्या प्रक्रियेची तसेच विहिरीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खा.डॉ. सुनील गायकवाड, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव, महापौर अख्तर शेख, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुशिल आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)उजनीहून रेल्वे वॅगनच्या आतापर्यंत चार फेऱ्या झाल्या असून, प्रती फेरी ५ लाख लिटर पाणी असे एकूण २० लाख लिटर पाणी मिरजेहून आणले आहे.