चौदा गुरूजींचा आज होणार सन्मान

By Admin | Updated: September 5, 2014 00:56 IST2014-09-05T00:44:06+5:302014-09-05T00:56:33+5:30

उस्मानाबाद : शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी आठ तालुक्यांतील मिळून १४ गुरूजींची निवड करण्यात आली आहे.

Fourteen Guruji to be honored today | चौदा गुरूजींचा आज होणार सन्मान

चौदा गुरूजींचा आज होणार सन्मान


उस्मानाबाद : शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी आठ तालुक्यांतील मिळून १४ गुरूजींची निवड करण्यात आली आहे. यांचा सन्मान ५ सप्टेंबर रोजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार केला जाणार असाल्याचे शिक्षणाधिकारी जाधव यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. सन २०१४-२०१५ या वर्षामध्ये आठ तालुक्यांतून १४ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांतून किशोर अनपट (उस्मानाबाद), संतोष माडजे (तुळजापूर), प्रवीण स्वामी (उमरगा), मोहन शेवाळे (लोहारा), गोविंद बाचेवाड (भूम), राजकुमार गुंजाळ (वाशी), दत्तात्रय वाघमोडे (परंडा) आणि कळंब तालुक्यातील श्रीहरी बिडवे यांचा समावेश आहे.
दरम्यान, माध्यमिक शिक्षकांमध्ये सय्यद अहमत अकबर (उस्मानाबाद), युवराज शिंदे (तुळजापूर), दिनकर कुलकर्णी (उमरगा), उत्रेश्वर पायघन (भूम) आणि कळंब तालुक्यातील शिवाजी फाटक यांची निवड झाली आहे. तसेच विशेष माध्यमिक शिक्षकांतून जिल्हा परिषद ईट प्रशालेचे पांडुरंग कवडे यांची निवड झाली. तर लोहारा, परंडा आणि वाशी तालुक्यातून पुरस्कारसाठीच्या अटींची पूर्तता न करणाऱ्या गुरूजींचे प्रस्ताव आले नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगीच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पुष्पक मंगल कार्यालयामध्ये होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fourteen Guruji to be honored today