शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षे झोप अन् निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांचा धडाका !

By admin | Updated: December 24, 2016 00:54 IST

लातूर : चौदावा वित्त आयोग आणि नगरोत्थान योजना तसेच भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा कोट्यवधींचा निधी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या झोपकाढू धोरणामुळे परत गेला.

लातूर : चौदावा वित्त आयोग आणि नगरोत्थान योजना तसेच भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा कोट्यवधींचा निधी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या झोपकाढू धोरणामुळे परत गेला. सिटी बस योजनाही बारगळली अन् आता निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांकडून विकासाच्या नावाखाली उद्घाटन व भूमिपूजनाचा धूमधडाका मनपाने सुरू केला आहे.महानगरपालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी विकास कामांकडे तसेच योजना राबविण्यास दुर्लक्ष केल्यामुळे चौदावा वित्त आयोग, नगरोत्थान योजना आणि सिटी बस योजनेचा ३० कोटींपेक्षा अधिक निधी परत गेला आहे. भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याची योजना ३२ कोटींची होती. या योजनेअंतर्गत तीनवेळा निविदा काढण्यात आल्या. परंतु, उदासीन भूमिकेमुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी, योजनेचा निधी परत गेला आणि आता साडेचार वर्षांनंतर निवडणुकीच्या तोंडावर विकास कामांच्या नावाखाली उद्घाटन आणि भूमिपूजनाचा धूमधडाका सुरू केला आहे. चार दिवसांपूर्वी नंदी स्टॉप परिसरात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. तर काही दिवसांपूर्वी अशोक हॉटेल चौकाचे नामकरण केले. हायमास्ट दिवे बसविण्याचाही फार्स सुरू केला आहे. २६ डिसेंबर रोजी सम्राट चौक येथे समाज मंदिराचे भूमिपूजन आणि कबाले वाटपाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर बार्शी रोडवरील पाण्याची टाकी परिसरात विविध विकास कामांचा प्रारंभ २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. सूरत शाहवली दर्गाह इमारतीच्या सुशोभिकरण कामाचा प्रारंभ २७ डिसेंबर रोजी केला जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर चौक परिसरातील रेल्वे स्टेशन रस्ता रुंदीकरणाच्या कामाचे उद्घाटन २४ डिसेंबर रोजी होणार आहे. असे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे मनपा पदाधिकाऱ्यांनी आयोजित केले आहे. गेल्या साडेचार वर्षांचा लेखाजोखा घेतला तर झोपकाढू धोरण प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे होते. आता निवडणुकीच्या तोंडावर नुकत्याच झालेल्या स्थायीच्या बैठकीत ४७ विषयांना मंजुरी दिली. (प्रतिनिधी)